Shravan Special rajgira shira recipe: श्रावण महिन्यात दररोज किंवा उपवासाला सतत तेच-तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर आता राजगिऱ्याचा शिरा ट्राय करा.हा शिरा चवीला तर उत्तम असतोच शिवाय पौष्टिकही असतो. चला पाहूया रेसिपी…
राजगिऱ्याचा शिरा बनवण्यासाठी साहित्य-
१ वाटी राजगिरा पीठ
३ चमचे गाईचे तूप
३ चमचे गूळ
१ वाटी दूध
२-३ वेलची
सजावटीसाठी बदामचे तुकडे
राजगिऱ्याचा शिरा बनवण्याची रेसिपी-
सर्वप्रथम एका पॅनमध्ये तूप गरम करा आणि त्यात राजगिऱ्याचे पीठ घाला आणि ते गुलाबी होईपर्यंत ढवळत रहा.
त्यानंतर गूळ, वेलची आणि दूध घाला आणि मंद आचेवर तूप तव्यावरून निघेपर्यंत ढवळत रहा आणि नंतर गॅस बंद करा.
आता तुमचा चविष्ट गरमागरम राजगिऱ्याचा शिरा तयार आहे, ते सर्व्हिंग बाऊलमध्ये घ्या आणि बदामाच्या कापांनी सजवा.





