श्रावणाची सुरुवात पावसाच्या सरीत प्रसन्न वातावरणात होते. शिवाला समर्पित असलेल्या या महिन्याची वाट सर्वजण अगदी आतुरतेने पाहत असतात. श्रावण महिना सुरु आहे आणि महादेवांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जात आहे. व्रत-वैकल्यांनी भरलेला पवित्र महिना श्रावण. श्रावण महिन्यात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात, तसेच या महिन्याला आत्मिक जागृतीचे प्रतीक मानले जाते. या पवित्र महिन्याचे स्वागत खास पद्धतीने करण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रियजनांना श्रावण महिन्याच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही हे खास संदेश पाठवू शकता….
श्रावणी सोमवारचे महत्व
श्रावणी सोमवारचे हिंदू धर्मात खूप महत्व आहे. श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे आणि या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी शंकराची पूजा करणे, उपवास करणे, अभिषेक करणे, इत्यादी धार्मिक कार्यांना विशेष महत्व दिले जाते. यामुळे, या दिवसाला ‘श्रावणी सोमवार’ असे संबोधले जाते. श्रावण महिना भगवान शंकराचा आवडता महिना मानला जातो आणि सोमवार हा त्यांचा दिवस असल्याने, या दिवशी शंकराची पूजा करणे खूप फलदायी मानले जाते.श्रावण महिना आणि सोमवार हे आत्मशुद्धी, संयम आणि साधनेसाठी महत्वाचे मानले जातात.
श्रावणी सोमवारच्या मित्र परिवाराला द्या खास शुभेच्छा…
महादेवाला करू वंदन
वाहू बेलाचे पान
महादेवा, सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रावण मासाला झाला प्रारंभ
करू शिवाच्या पूजेला आरंभ
ठेऊ शिवाचे व्रत
होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे
शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे
शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती
श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!
रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
पानापानात लपला श्रावण
फुलाफुलांत उमलला श्रावण
श्रावण महिन्याच्या मन भरून शुभेच्छा!
महाकाल नावाची किल्ली
उघडेल तुमच्या नशिबाची खिडकी,
होतील सर्व कामे पूर्ण तुमची
श्री शिव शंकराची हीच महती,
ओम नम: शिवाय
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
संस्कृतीचा अनमोल ठेवा राखण्या
आला तो श्रावण पुन्हा आला…
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)





