MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

श्रावण महिन्यात बनवा उपवासाची अंजीर खीर, एकदम सोपी आहे रेसिपी

श्रावण महिन्यात श्रावण सोमवारचा उपवास केला जातो.
श्रावण महिन्यात बनवा उपवासाची अंजीर खीर, एकदम सोपी आहे रेसिपी

Shravan Special Recipes:   हिंदू कॅलेंडरनुसार, श्रावण हा चैत्र महिन्यापासून सुरू होणारा वर्षाचा पाचवा महिना आहे. श्रावण महिन्यात  श्रावण सोमवारचा उपवास केला जातो. त्यामुळेच आपण उपवासाला खाता येणारी अंजीरच्या खीरची रेसिपी पाहूया…

 

अंजीरची खीर बनवण्यासाठी साहित्य-

 

५ अंजीर
१ कप मखाना
१ कप राजगिरा
१/२ कप सुकामेवा
५ कुस्करलेली वेलची
१/२ कप साखर
४ कप दूध

 

अंजीरची खीर बनवण्याची रेसिपी-

 

सर्वप्रथम, अंजीर कोमट पाण्यात १/२ तास भिजवा. भिजल्यानंतर ते मिक्सरमध्ये ठेवा आणि पेस्ट बनवा.

आता एका पॅनमध्ये दूध गरम करा. नंतर त्यात बारीक केलेला मखाना आणि राजगिरा घाला, आता बारीक केलेला अंजीर घाला आणि मिक्स करा. त्यानंतर सुकामेवा आणि वेलची पावडर घाला.

आता ते थोडे उकळू द्या आणि नंतर साखर किंवा गूळ घाला आणि गॅस बंद करा.

चविष्ट अंजीर मखाना आणि राजगिऱ्याची उपवासाची खीर तयार आहे.