Shravan Somwar Special Recipes: हिंदू कॅलेंडरनुसार, श्रावण हा चैत्र महिन्यापासून सुरू होणारा वर्षाचा पाचवा महिना आहे. श्रावण महिन्यात श्रावण सोमवारचा उपवास केला जातो. त्यामुळेच आपण उपवासाला खाल्ली जाणारी राजगिऱ्याच्या पुरीची रेसिपी पाहूया…
राजगिऱ्याची पुरी बनवण्यासाठी साहित्य-
२०० ग्रॅम राजगिरा पीठ
१ टेबलस्पून तेल
१ टेबलस्पून काळी मिरी पावडर
१ टेबलस्पून जिरे पावडर
१ टेबलस्पून गुलाबी मीठ
गरजेनुसार तळण्यासाठी तेल
गरजेनुसार पीठ बनवण्यासाठी पाणी
राजगिऱ्याची पुरी बनवण्याची रेसिपी-
एका भांड्यात राजगिऱ्याचे पीठ घ्या आणि त्यात भाजलेले जिरे, काळी मिरी पावडर आणि मीठ घाला.
मऊ पीठ बनवण्यासाठी तेल आणि पाणी घाला आणि पीठ मळून घ्या.
कणिक दहा ते पंधरा मिनिटे कापडाने झाकून ठेवा. नंतर या पीठाचे छोटे गोळे बनवा.
आता पुऱ्या लाटून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करा आणि सर्व पुऱ्या तळून घ्या.
राजगिऱ्याची उपवासाची पुरी तयार आहे.





