Janmashtami 2024 Puja Samagri List: हिंदू धर्मात भगवान श्री कृष्णाची पूजा केल्याने सर्व दु:खापासून मुक्ती मिळते आणि सुख-समृद्धी नांदते. याच कारणास्तव कृष्णाचे भक्त संपूर्ण वर्षभर जन्माष्टमीची वाट पाहत असतात. आणि त्या दिवशी कृष्णावर श्रद्धा आणि विश्वास ठेवत विधीवत पूजा केली जाते. यातून त्याच्या सात जन्माचे पाप दूर होतात. कृष्णाच्या आशीर्वादाने सर्व मनोकामना पूर्ण होते. जाणून घेऊया जन्माष्टमीला कृष्णाची पूजा करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते.
कोणत्या वस्तूंशिवाय जन्माष्टमीची पूजा अपूर्ण मानली जाते…
हिंदू मान्यतेनुसार, जर तुमच्याकडे खाली दिलेल्या यादीतील वस्तू नसतील तरी तुम्हाला निराश होण्याची गरज नाही. जन्माष्टमीला कृष्णाच्या काही आवडत्या वस्तू अर्पण करून तुम्ही त्यांचा आशीर्वाद मिळवू शकता. कान्हाच्या पूजेशी संबंधित सर्वात महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊ.
काकडी..
श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा काकडीशिवाय अपूर्ण मानली जाते. ज्याप्रमाणे बाळाच्या जन्माच्या वेळी त्याची नाळ त्याच्या आईपासून वेगळी करण्यासाठी कापली जाते, त्याचप्रमाणे जन्माष्टमीला बाळाला त्याच्या आईपासून वेगळे करण्यासाठी काकडी प्रतीकात्मकपणे कापली जाते. त्यानंतर, त्याला आंघोळ घालून विधीनुसार पूजा केली जाते.
बासरी…
भगवान श्रीकृष्णाला बासरी वाजवणं प्रिय होतं. कृष्ण बासरी कायम सोबत ठेवत असे. अशात जन्माष्टमीदिनानिमित्ताने तुम्ही बासरी अर्पण केली तर निश्चितपणे श्रीकृष्ण प्रसन्न होऊन तुमची मनोकामना पूर्ण होईल.
मोराचा पंख…
कृष्णाचं गायीप्रमाणे मोराशीही जवळच नातं होतं. त्यामुळे ते मोराचा पंख नेहमी आपल्या माथ्यावर धारण करतात. यासाठी जन्माष्टमीला कृष्णाला मोराचा पंख द्यायला विसरू नका.
वैजयंती माळ
जर तुम्ही भगवान श्रीकृष्णाला सजवण्यासाठी सर्व प्रकारचे दागिने खरेदी करत असाल, तर वैजयंती माळ खरेदी करायला विसरू नका कारण ती भगवान श्रीकृष्णाला खूप प्रिय होती.
लोणी-साखर
भगवान श्रीकृष्णाला लोणी-साखर अवश्य अर्पण करा. जन्माष्टमीला लोणी साखर अर्पण केल्याने कृष्ण लवकर प्रसन्न होतो आणि त्याच्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतो, असं मानलं जातं.
श्रीकृष्ण जन्माष्टमी पूजा सामग्रीची संपूर्ण यादी
बालपणीच्या रुपातील भगवान श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो
पूजेसाठी चौरंग
पाच प्रकारची पाने – वड, गुळ, पिंपळ, पाकर आणि आंबा
केळीचे पान
तुळशीचे पान – पानांसह
पाच प्रकारची हंगामी फळे
सप्तमृतिका
सप्तधान्य
नारळ
गंगाजल
मध
साखर
दही
दूध
फूल
माळ
गोड-मिळाई
पंचामृत
पंचमेवा
दीप
धूप
दिवा
कापसाची वात
शुद्ध तूप
केशर
कापूर
चंदन
हळद
कुंकू
अक्षता
अत्तर
शंख
पवित्र पाणी
भगवंताला स्नान घालण्यासाठी पात्र
कलश किंवा पाणी ठेवण्यासाठी इतर कोणतंही भांडं
सुपारीची पाने, सुपारी, वेलची, लवंग,
अख्खे धणे
जानवं
लड्डू गोपाळ किंवा श्रीकृष्णाच्या मूर्तीसाठी नवीन कपडे
मोरपंख असलेला मुकुट
दागिने किंवा तुळशीची माळ
बासरी
रक्षासूत्र
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही. तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)





