कार्तिक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शुक्र आपली राशी बदलेल (Shukra Gocha). ९ ऑक्टोबर २०२५ रोजी शुक्र सिंह राशी सोडून कन्या राशीत जाईल, जिथे तो २ नोव्हेंबर २०२५ पर्यंत राहील. त्यानंतर शुक्र तूळ राशीत प्रवेश करेल. शुक्र सुमारे २५ दिवस कन्या राशीत राहील. शुक्रच्या स्थानात किंवा राशीत होणारा हा बदल अनेक राशींना आनंददायी अनुभव देईल. या दरम्यान काही लोकांच्या जीवनात प्रेम आणि नात्यांचा गोडवा वाढेल. तसेच अनेकांना करियर आणि आर्थिक क्षेत्रातही मोठे यश मिळू शकते.
1) वृषभ राशी
शुक्राचे गोचर वृषभ राशीच्या लोकांना पैशाबरोबर प्रेम देखील देईल. ज्या व्यक्तींचे लग्न झालेले नाही त्यांच्यासाठी 9 ऑक्टोंबर नंतरचा काळ लग्नासाठी अनुकूल राहणार आहे. उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत निर्माण होतील आणि साहजिकच आर्थिक परिस्थिती चांगली राहील. नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना नोकरी लागण्याची शक्यता आहे. नशीब तुमचं अत्यंत जोरावर आहे, जिथे तुम्ही लाथ माराल तिथे पाणी काढू शकता.

2) मिथुन राशी Shukra Gochar
मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर दुसऱ्या घरात असेल. या वेळी तुमच्यासाठी कौटुंबिक आनंद वाढेल. मिथुन राशीचे लोक 9 ऑक्टोबर पासून नवनवीन वस्तूंची खरेदी करू शकता. घरातील वातावरण अत्यंत आनंदाचे राहील. कोणासोबत जुने वाद असतील तर, ते सुद्धा 9 ऑक्टोबर नंतर मिटण्याची शक्यता आहे. जुने मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला भेटू शकतात आणि बाहेर कुठेतरी फिरण्याचा योग जुळून येईल.
3) सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचे हे गोचर धन (Shukra Gochar) भावात होत आहे. या बदलामुळे तुम्हाला करिअरमध्ये प्रगती होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. अनेक दिवसापासून रखडलेली कामे 9 ऑक्टोबर पासून मार्गी लागू शकतात. शुक्र राशीच्या गोचरमुळे सिंह राशीच्या लोकांना अनपेक्षित संपत्ती मिळू शकते. गुंतवणुकीसाठी 9 ऑक्टोबर नंतरचा काळ अतिशय अनुकूल राहील. वडिलोपार्जित मालमत्तेचा फायदा होईल. घरात सुख समृद्धी आणि शांती नांदेल. जुने प्रेम पुन्हा मिळण्याची शक्यता आहे.
4) धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे गोचर खूप फायदेशीर ठरेल. शुक्राच्या गोचरमुळे कामाच्या क्षेत्रात विशेष फायदे मिळू शकतात. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा 9 ऑक्टोबर नंतरचा काळ अतिशय अनुकूल असेल. तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











