वास्तुशास्त्रानुसार, आपल्या आजूबाजूला घडणार्या काही घटना अतिशय शुभ मानल्या जातात. त्यातून आपल्याला येणाऱ्या काळाबद्दल काही संकेत मिळतात. अनेकदा असं काही दिसतं की, त्यातून पैशांचा लाभ होण्याचं संकेत मिळतात. वास्तुशास्त्रानुसार आपल्या जीवनात असे काही संकेत आहेत, जे घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवतात. काय आहेत हे संकेत? जाणून घेऊया सोप्या शब्दात…
काळ्या मुंग्या घरात येणं
वास्तुशास्त्रानुसार, अचानक घरात काळ्या मुंग्यांचा थवा दिसणे आणि अन्नपदार्थांभोवती घिरट्या घालणे हे शुभ लक्षण मानले जाते. हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि ते दिसणे हे सूचित करते की घरातील आर्थिक संकट लवकरच संपेल. काळ्या मुंग्या घरात येणे म्हणजे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्याचा संकेत आहे. काळ्या मुंग्या शुभ मानल्या जातात आणि त्या आर्थिक प्रगतीचाही संकेत देतात. त्यातही या काळ्या मुंग्या काही खात असताना दिसल्या तर ही बाब चांगली किंवा शुभ असू शकते. याचा अर्थ तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
घरी पक्ष्यांची घरटी
चिमणी किंवा कबुतर किंवा तत्सम पक्षी तुमच्या घराच्या अंगणात किंवा गॅलरीत घरटं बांधत असतील तर ही बाब शुभ मानली जाते. हे घरासाठी सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक आहे. त्यांचे घरटे बांधणे हे घर, शांती आणि समृद्धी येण्याचे संकेत आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)





