MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

गपणती बाप्पा मोरया…गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या प्रिय व्यक्तींना ‘या’ खास शुभेच्छा द्या!

Written by:Rohit Shinde
Published:
गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होता आहे. खरंतर गणेश चतुर्थी हा आनंद, श्रद्धा आणि उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे. या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देऊन बाप्पाच्या आशीर्वादाची कामना करतात.
गपणती बाप्पा मोरया…गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या प्रिय व्यक्तींना ‘या’ खास शुभेच्छा द्या!

आज 27 ऑगस्ट, 2025 देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होता आहे. खरंतर गणेश चतुर्थी हा आनंद, श्रद्धा आणि उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे. या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देऊन बाप्पाच्या आशीर्वादाची कामना करतात. शुभेच्छांमुळे आपुलकी, ऐक्य आणि सद्भावना वाढते. “गणपती बाप्पा मोरया”चा जयघोष करून आपण सर्वांमध्ये सकारात्मकता निर्माण करतो. शुभेच्छा देण्याची परंपरा आपल्याला समाजात एकत्र आणते आणि नातेसंबंध अधिक दृढ करते. या सणातील शुभेच्छा म्हणजे आनंद, समृद्धी आणि सौहार्दाचा संदेश. गणपती बाप्पा संकट दूर करून ज्ञान, बुद्धी व यश प्रदान करतात, अशी भावना शुभेच्छांमधून व्यक्त केली जाते. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्याला अत्यंत महत्व आहे. त्यासाठी काही खास शुभेच्छा जाणून घेऊ…

प्रियजनांना ‘या’ शुभेच्छा नक्की द्या!

गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
यंदाच्या गणेशोत्सवाला
सर्वांनी मिळूनी
बाप्पाची पूजा करुया
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!

बाप्पाच्या आगमनाने
आसमंत बहरला
चोहीकडे भक्तीचा
सुगंध दरवळला
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!

बाप्पाच्या आगमनाची
वाट पाहतो आतुरतेने
बाप्पाच्या चरणी
नमन करतो श्रद्धेने
गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

मोदक, लाडू, बर्फी
गोड गोड प्रसाद
आणला गणरायासाठी
नयन आतुर बाप्पाच्या आगमनासाठी
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आगमनाने त्याच्या वातावरण
प्रसन्न झाले, निसर्ग बहरला
इंद्रदेवाने पाऊस पाडला
स्वागत त्याचे सृष्टीने केले
गणरायाचे थाटामाटात आगमन झाले
गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

मोरया रे बाप्पा मोरया रे
आला गणराया लाडका
स्वागताला सर्वांनी या रे
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!

गणेशोत्सवामुळे भक्तांमध्ये मोठा उत्साह

लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होते. वर्षभरासाठी बाप्पाच्या दर्शनासाठी आतुर असलेले नयन बाप्पाच्या येण्याने त्यांची एक झलक पाहून सुखावून जातात. यंदाच्या गणेशोत्सवाची आता सुरुवात होत असून बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत.