श्रावण महिना संपला की, वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. गणेश चतुर्थीला महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. घराघरात गणपती बाप्पाचे आगमन होते आणि पुढील दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन कधी आहे हे जाणून घेऊया…
यंदा बाप्पाचं आगमन कधी?
श्रावण महिना संपला की, वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी असते. या दिवशी गणपती बाप्पाचे आगमन होते. पंचांगानुसार, यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 26 ऑगस्ट दुपारी 01 वाजून 54 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 27 ऑगस्टला दुपारी 03 वाजून 44 मिनिटांपर्यंत असणार आहे. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट 2025 रोजी साजरी करण्यात येणार आहे. यंदा गणेश चतुर्थी 27 ऑगस्टला आहे, त्यामुळे गणपती बाप्पाचे आगमन 27 ऑगस्टला होईल.





