यंदाची दिवाळी 20 ऑक्टोबरला असून सर्वत्र दिवाळीच्या तयारीची लगबग पाहायला मिळत आहे. धनत्रयोदशीपासून या आपल्या आवडत्या सणाला सुरुवात होते. यंदा 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाईल. हा दिवस भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या पूजेसाठी समर्पित असतो. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच १७ ऑक्टोबर २०२५ ला सूर्य देवाचे (Surya Gochar 2025) राशी परिवर्तन होणार आहे. सूर्य देव, कन्या राशी सोडून तूळ राशीत प्रवेश करेल. हे राशी परिवर्तन कन्या आणि धनु या 2 राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या राशींच्या लोकांच्या करिअरवर आणि नोकरीवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. चला तर मग याबाबत जाणून घेऊया.
1) कन्या रास
सूर्य तूळ राशीत प्रवेश केल्याने (Surya Gochar 2025) कन्या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होतात. या राशीच्या लोकांच्या आर्थिक संपत्तीत मोठी वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कलेला समाजात वाव मिळेल आणि तुम्ही मानसन्मान मिळवाल. धनत्रयोदशीला तुम्ही नवीन गाडी किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. धार्मिक कार्यात तुमचा रस वाढेल. देवदर्शन घडण्याचा योग जुळून येईल. कन्या राशीचे लोक सरकारी नोकरीच्या शोधात असतील तर हा काळ त्यांच्यासाठी अत्यंत अनुकूल राहील.

2) धनु रास – Surya Gochar 2025
सूर्य तूळ राशीत प्रवेश केल्याने धनु राशीच्या लोकांना विशेष फायदा होणार आहे. धनु राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, समाजात मान सन्मान मिळेल. आणि आर्थिक ताकद वाढेल. गुंतवणुकीसाठी धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय चांगला असेल परंतु तज्ञांचा सल्ला घेऊनच योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नवीन नोकरी मिळेल. व्यवसायिकांना दुप्पट उत्पन्न मिळेल. घरामधील वातावरण अत्यंत सकारात्मक राहील. नवीन मित्र मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुमच्या साथीदाराकडून आणखी प्रेम मिळेल. परंतु या ठिकाणी तुम्हाला एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, ती म्हणजे तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. एखादी व्यक्ती दुखावणार नाही याची काळजी घ्या.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











