Surya Gochar 2025 : सूर्य गोचरचे ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो आणि त्याच्या गोचरमुळे (एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश) अनेक राशींच्या जीवनात बदल घडतात. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. सूर्य गोचरचा संपूर्ण 12 राशींच्या जीवनावर मोठा परिणाम होतो. पंचागानुसार, सूर्य १६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजून ४४ मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश करेल. सूर्याचे हे गोचर 3 राशींच्या लोकांना सुखाचे दिवस देणार आहे. त्या राशीच्या लोकांना बक्कळ पैसा, समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल.
मेष (Aries) Surya Gochar 2025
मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी परिवर्तन खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग निर्माण होतील. तुम्ही 16 नोव्हेंबर नंतर नवीन जमीन किंवा घर खरेदी करू शकाल. तर तुम्ही गुंतवणूक करण्याची विचारात असेल तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय अनुकूल राहील परंतु विचार करूनच योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी.

वृश्चिक (Scorpio)
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्य गोचरचा (Surya Gochar 2025) विशेष लाभ होताना दिसत आहे. 16 नोव्हेंबर नंतर या व्यक्तींना व्यवसायात मोठे यश मिळेल. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी प्रमोशन भेटेल आणि साहजिकच त्यामुळे पगारात वाढ होईल. जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना आजपर्यंत कधीही नोकरी लागली नाही अशा तरुणांनाही नोकरीच्या नवनवीन संधी निर्माण होतील. घरातील कौटुंबिक वातावरण सुधारेल. आई-वडिलांचे संबंध अतिशय सकारात्मक राहतील. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.
कुंभ (Aquarius)
सूर्याचे राशी परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे कुंभ राशीच्या लोकांना अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे. घरामध्ये नवनवीन वस्तू खरेदी कराल. तुमची जुनी काही कामे अडकली असतील तर ती 16 नोव्हेंबर नंतर पूर्ण होऊ शकतात. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरी करणाऱ्याला कामाच्या ठिकाणी बढती मिळेल.