आपल्या प्रत्येकाच्या दारासमोर तुळस (Tulsi) असतेच. हिंदू धर्मात तुळस अत्यंत महत्त्वाची मानले जाते. तुळस ही फक्त औषधी वनस्पतीच नाही तर धार्मिकदृष्ट्याही तिला मोठं महत्त्व आहे. हिंदू धर्मात तुळशीच्या पूजेचे महत्त्व देव-देवतांशी जोडले गेले आहे. असे मानले जाते की दररोज तुळशीला पाणी अर्पण केल्याने आणि दिवा लावल्याने भक्ताला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात आनंद आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होते. अशावेळी जर तुम्हाला तुमच्या तुळशीच्या रोपात काही बदल दिसले तर याकडे दुर्लक्ष करू नका कारण असं झाल्यास नक्कीच तुमच्या आयुष्यात काही बदल होण्याची संकेत असू शकतात.
हिरवे रोप – Tulsi
जर तुमच्या घरात तुळशीचे रोप हिरवेगार आणि टवटवीत असेल तर ते एक शुभ चिन्ह मानले जाते. हिरवीगार तुळस म्हणजे लक्ष्मी मातेचा तुमच्यावर असलेला आशीर्वादच सुनिश्चित करतो. तुमच्यावर कधीही कोणती आर्थिक संकटे येणार नाहीत. तसेच जर कोणत्या अडचणी असतील तर त्यातूनही तुमची सुटका होऊ शकते. तुळशीचे हिरवे रोप म्हणजे घरात सुख समृद्धी आणि आनंद…. संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर मानले जाते..

तुळशीचे आध्यात्मिक महत्त्व
तुळशीला (Tulsi) विष्णुप्रिया असेही म्हणतात कारण ती भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. तुळशीशिवाय भगवान विष्णूला अर्पण करणे अपूर्ण मानले जाते. जर तुमच्या घरात तुळशी नैसर्गिकरित्या वाढली असेल, तर हे एक सकारात्मक लक्षण आहे की भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर आहे आणि तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येणार आहे.
नकारात्मक चिन्हे
जर तुमच्या दारातील तुळस अचानकपणे सुकली तर नक्कीच हे एक नकारात्मक चिन्ह असू शकते. कदाचित तुमच्यावर मोठे संकट येण्याची शक्यता असते. अशावेळी त्या वाळलेल्या तुळशीला नदी किंवा तलावात बुडवून देव-देवतांची क्षमा मागण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे घरातील नकारात्मक प्रभाव कमी होतो आणि संकटे दूर होतात असं मानलं जातं.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











