Tulsi : घरात वाळलेले तुळशीचे रोप का ठेवू नये? कारण जाणुनच घ्या

Asavari Khedekar Burumbadkar

हिंदू धर्मात तुळशीचे (Tulsi) रोप देवी लक्ष्मीचे रूप आणि भगवान विष्णूंचे आवडते मानले जाते. तुळशीचे रोप हे घरात सकारात्मक ऊर्जा आणते. परंतु हे रोप हिरवेगार असावे . घरात कधीही सुकलेले तुळशी ठेवू नये असं म्हटलं जातं. यामागे काही अध्यात्मिक कारणे आहेत. चला तर मग त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

प्रत्येक घरात असलेले तुळशीचे रोप केवळ श्रद्धेचे प्रतीक नसते तर घरात पवित्रता आणि सकारात्मक उर्जेचे केंद्र देखील असते. परंतु तुळशीचे रोप सुकल्यानंतर ते घरात ठेवू नये. कारण जेव्हा तुळशीचे रोप सुकते तेव्हा त्याचा अर्थ त्या ठिकाणाचे पावित्र्य कमी होत आहे. म्हणून, घरात वाळलेले तुळशीचे रोप ठेवणे देवी तुळशीचा अपमान मानला जातो.

वास्तुशास्त्रानुसार परिणाम (Tulsi)

वास्तुशास्त्रानुसार, वाळलेल्या तुळशीच्या रोपामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते.

अशा वनस्पती घराच्या शांती, आनंद आणि समृद्धीवर परिणाम करतात.

घरात वाळलेल्या तुळशीचे (Tulsi) रोप ठेवल्याने आर्थिक अडचणी आणि मानसिक ताण येऊ शकतो.

वाळलेल्या तुळशीचे काय करावे

जर तुळशीचे रोप सुकले तर ते पवित्र पद्धतीने विल्हेवाट लावावे.

तुळशीच्या रोपावर गंगाजल शिंपडा आणि आदराने मातीत पुरा.

नवीन रोप लावण्यापूर्वी, घराच्या समोरील परिसर स्वच्छ करा आणि दिवा लावा.

तुळशीचे नवीन रोप लावताना “ओम तुलस्यै नमः” मंत्राचा जप करा. तुळशीच्या रोपाला दररोज पाणी घाला.

ताज्या बातम्या