Vaishno Devi Temple : वैष्णोदेवीला जाणाऱ्या भक्तांची संख्या घटली; काय आहे यामागील कारण

आकडेवारी नुसार, या वर्षी आतापर्यंत भाविकांची संख्या गेल्या वर्षीपेक्षा २.४ दशलक्ष कमी झाली आहे. वैष्णोदेवी श्राइन बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या मते, गेल्या ११ महिन्यांत भाविकांची संख्या ८,८९१,०५५ झाली आहे, जी मागील वर्षीच्या तुलनेत २,४७६,९४९ ने कमी आहे

Vaishno Devi Temple : जम्मू-काश्मीरमधील त्रिकुटा पर्वतावर असलेल्या माता वैष्णोदेवीच्या मंदिराकडे जाणारी एक पवित्र आणि आव्हानात्मक यात्रा आहे. मात्र तरीही दरवर्षी लाखो करोडो भाविक वैष्णोदेवीला जात असतात आणि देवीचे आशीर्वाद घेत असतात. परंतु, या वर्षी वैष्णोदेवी मंदिराच्या यात्रेवर अनेक घटकांचा गंभीर परिणाम झाला आहे. परिणामी, या वर्षी भाविकांची संख्या कमालीची घटली आहे.

यंदा किती यात्रेकरूनी भेट दिली (Vaishno Devi Temple)

आकडेवारी नुसार, या वर्षी आतापर्यंत भाविकांची संख्या गेल्या वर्षीपेक्षा २.४ दशलक्ष कमी झाली आहे. वैष्णोदेवी श्राइन बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या मते, गेल्या ११ महिन्यांत भाविकांची संख्या ८,८९१,०५५ झाली आहे, जी मागील वर्षीच्या तुलनेत २,४७६,९४९ ने कमी आहे. जरी श्राइन बोर्ड आणि कटरा येथील व्यापारी समुदायाला आशा होती की या वर्षी पर्यटकांची संख्या नवीन रेकॉर्ड बनवेल. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती उलटी पहायला मिळाली. Vaishno Devi Temple

यात्रेकरूंची संख्या कमी का झाली??

वैष्णो देवीला जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या कमी होण्यामागे काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत. यावर्षी  प्रयागराजमधील महाकुंभमेळा या वर्षाची सुरुवात झाली, त्यानंतर एप्रिलमध्ये पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध झाले. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी वैष्णोदेवी मार्गावरील अर्धकुंभवारी मंदिर परिसरात झालेल्या मोठ्या भूस्खलनामुळे ३४ यात्रेकरूंचा मृत्यू झाला आणि जवळपास दोन डझन जण जखमी झाले. त्यावेळी, वैष्णोदेवीची यात्रा सुमारे २२ दिवसांसाठी पूर्णपणे स्थगित करण्यात आली होती. सध्या, वैष्णोदेवीची यात्रा सुरळीत सुरू आहे, परंतु कटरा रेल्वे स्थानकावर येणाऱ्या बहुतेक गाड्या स्थगित राहिल्या आहेत, ज्यामुळे वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांची संख्या कमी कमी होत आहे.

येत्या काही दिवसांत, नवीन वर्ष सुरू होईल.तसेच कटरा रेल्वे स्थानकावर आणखी काही गाड्या येतील अशी अपेक्षा आहे, त्यामुळे वैष्णोदेवी यात्रेत वाढ होऊ शकते. सध्या, वैष्णोदेवीच्या यात्रेकरूंसाठी हवामान अनुकूल आहे. तसेच पर्यटन विभाग, श्री माता वैष्णोदेवी तीर्थ मंडळ, राज्य प्रशासन, स्थानिक अधिकारी आणि व्यवसाय वैष्णोदेवीच्या यात्रेकरूंची संख्या वाढवण्यासाठी आणि आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी सतत काम करत आहेत.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News