ऐरवी दुर्लक्षित असलेल्या तुरटीचे अनेक फायदे आहेत, जे कदाचित आपल्याला माहिती नसतील. तुरटीमध्ये नकारात्मक ऊर्जा रोखण्याची शक्ती असते. पाण्यात तुरटी एकत्र करून फरशी पुसल्याने नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो. भांडणं होत नाही आणि घरात सुखशांती नांदते.
तुरटीचे पाच जबरदस्त उपाय l turati che 5 upay
1 दुकान किंवा व्यापाऱ्याच्या ठिकाणी कमाई कमी झाली असेल किंवा बिजनेसमध्ये कोणाची नजर लागली असेल तर एका काळ्या कपड्यामध्ये तुरटी बांधून कार्यस्थळाच्या मुख्य द्वारापाशी लटकवू शकता. यातून समृद्धी येईल अशी मान्यता आहे.
2 लहान मुलांना वाईट स्वप्न येत असतील तर मंगळवारी आणि शनिवारी ५० ग्रॅम तुरटी घ्यावी आणि झोपताना मुलांच्या डोक्याजवळ किंवा उशी खाली ठेवावी. वास्तूनुसार, यामुळे मुलांना चांगली झोप येईल आणि भीतीदायक स्वप्न येणार नाहीत.
वैवाहिक जीवनात सुख-शांती लाभेल…
3 पती-पत्नीमध्ये सतत भांडणं होत असतील, नात्यात दुरावा आला असेल, तर तुरटीचा तुक़ा अंथरुणाखाली काळ्या कपड्यात बांधून ठेवा. यानुळे वैवाहिक आयुष्यात सुरू असलेले वाद कमी होतील.
4 कर्जाचं ओझं कमी होत नाही, किंवा पैशांची अडचण असेल बुधवारी एक तुरटीचा तुकडा घ्या त्याला कुंकू लावा, एका हिरव्या पानात गुंडाळून ठेवा. आणि सायंकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली एखाद्या दगडाने जमिनीत पुरा. असं केल्याने लवकरच कर्जाच्या ओझ्यातून तुमची सुटका होईल.
5 वास्तूच्या नियमांनुसार, आंघोळीच्या पाण्यात तुरटी घातल्याने पैशांसंबधित समस्येवर उपाय सापडतो.
(टिप: वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आणि अध्यात्मिक साधनांवर आधारीत आहे. यामध्ये कोणतेही वैयक्तिक दावे अथवा हेतू नाहीत.)





