आपल्या भारतात वास्तुशास्त्राला (Vastu Tips) फार मोठे महत्त्व आहे. नवीन घर बांधताना ते वास्तुशास्त्रानुसारच आहे का हे आधी बघितलं जातं. घराची इंटरियर सुद्धा वास्तुशास्त्रानुसारच बनवले जाते. घरात कोणकोणत्या वस्तू ठेवायच्या आणि महत्वाच म्हणजे ती वस्तू कोणत्या दिशेला ठेवायची हे पाहणे महत्वाचे असतें. मित्रानो वास्तुशास्त्रात माशांना सुद्धा मोठं महत्त्व आहे. आपल्यापैकी अनेकजण त्यांच्या घरात धातूचे मासे ठेवतात, जे अत्यंत भाग्यवान मानले जातात. परंतु, माशांच्या धातूची काळजी घेणे सुद्धा तितकंच महत्वाचे आहे.
पितळेचा मासा बदलेल तुमचं भाग्य
घरात पितळेचा मासा ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही आणि सगळं काही चांगलच होत. आर्थिक प्रगती तर यामुळे होतीच परतू दुसरी गोष्ट म्हणजे घरातील सदस्यांचे आरोग्य सुद्धा अतिशय चांगलं राहतें. कधीच कसली अडचण किंवा समस्या येत नाही.

कोणत्या दिशेला ठेवावे ? Vastu Tips
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला पितळेचा मासा ठेवणे सर्वात शुभ मानले जाते. उत्तर दिशेला मासा ठेवल्याने नोकरी आणि व्यवसायात यश मिळते आणि उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होतात. परंतु हा पितळेचा मासा लाल कपड्यावर ठेवा. तसेच पितळेचा मासा दररोज स्वच्छ ठेवा. त्यावर धूळ पडता कामा नये. बरेच लोक लोखंडी मासे देखील ठेवतात, जे अशुभ मानले जातात आणि नकारात्मक उर्जेचा स्रोत आहेत.
घरात पितळेचा मासा ठेवण्याचे काय फायदे?
घरात पितळेचा मासा ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मकता पसरते. Vastu Tips
माशांचा संबंध धनाची देवी लक्ष्मी आणि धनाचा देव कुबेर यांच्याशी आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे घरात आर्थिक स्थिरता आणि समृद्धी येते.
ज्योतिषशास्त्रानुसार, घरात पितळेचा मासा ठेवल्याने चंद्र आणि बुध ग्रह मजबूत होतात. बुध हा धन, ज्ञान आणि वाणीचा कारक आहे, तर चंद्र सुख आणि शांती प्रदान करतो. शनि आणि राहूचे दुष्परिणाम कमी होतात असे देखील मानले जाते.
व्यवसायात किंवा नोकरीत प्रगती हवी असेल तर पितळेचा मासा ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे तुमची रखडलेली कामे लवकर पूर्ण होतात आणि प्रगतीचा मार्ग मोकळा करते.
पितळेच्या माशामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद आणि प्रेम वाढवते, घरात शांती आणि आनंद येतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











