आपल्या सर्वांना घरातील वस्तू या वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips) ठेवाव्या असे वाटते. वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक वस्तूसाठी विशिष्ट नियम आहेत आणि त्या या नियमांनुसार ठेवल्या पाहिजेत. घरात नकारात्मक ऊर्जा येऊ नये म्हणून, कोणतीही वस्तू योग्य ठिकाणी ठेवावी, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. आपल्या घरातील महत्वाची गोष्ट म्हणजे कपात…. असं म्हणतात की आपल्या कपाटात आपला अर्धा संसार बसलेला असतो. अनेक महत्त्वाच्या वस्तू आपण आपल्या कपाटात सुरक्षित ठेवत असतो. परंतु तुम्हाला माहितीये का असे काही वस्तू आहेत ज्या कपाटात ठेवल्याने तुमची आर्थिक अधोगती होऊ शकते, पैशाची समस्या निर्माण होऊ शकते आणि तुम्ही भिकेला सुद्धा लागू शकता. या वस्तू कोणत्या आहेत हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
परफ्यूम –
मित्रांनो आज अनेक जण परफ्यूम वापरतात. शरीरावर परफ्यूम मारल्याने आपले इम्प्रेशन वाढते. परफ्यूम वापरणं ही तशी चांगलीच गोष्ट आहे परंतु हाच परफ्युम कधी तुमच्या घरातील कपाटात ठेवू नका. कारण यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. तुमच्या वॉर्डरोबमध्ये सुगंधित परफ्यूम ठेवल्याने आर्थिक नुकसान होण्याची आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

आरसा (Vastu Tips)
आरसा तर आपल्या प्रत्येकाच्याच घरात आहे. सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर सर्वात आधी आपण आरशाकडे बघत असतो. आरसा आजकाल गरजेची वस्तु असली तरी तुमच्या कपाटात ठेवू नका. कारण घराच्या कपाटात आरसा ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे तुम्ही गरिबीच्या दिशेने ढकलला जाऊ शकता.
फाटका कागद
कपात म्हणजे आपली तिजोरी… कपाटात नेहमीच लक्ष्मी मातेचा वास असतो. म्हणून, कपाटात फाटलेले किंवा वाया जाणारे कागद टाळा. यामुळे देवी लक्ष्मीला राग येऊ शकतो आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. (Vastu Tips)
काळया रंगाचे कपडे
वास्तुशास्त्रानुसार, कपाटात काळी वस्तू, जसे की काळा शर्ट, काळी पँट, काळा रुमाल, काळी बॅग अशा वस्तू ठेवू नका. काळया रंगामुळे तुमच्या आर्थिक संपत्तीला आणि भरभराटीला धक्का बसू शकतो. तसेच पैशाच्या मार्गात अडथळे येऊ शकतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











