MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

स्वयंपाकघरात अजिबात करू नका ‘या’ चुका, होईल धनधान्याची कमतरता

Published:
हिंदू धर्मानुसार स्वयंपाकघरात देवी अन्नपूर्णाचा वास असतो. देवीला प्रसन्न करण्यासाठी काही वास्तु नियम पाळले पाहिजेत.
स्वयंपाकघरात अजिबात करू नका ‘या’ चुका,  होईल धनधान्याची कमतरता

Kitchen Vastu Tips In Marathi:   घरामध्ये मंदिरनंतर सर्वात जास्त महत्व स्वयंपाकघराला आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो. त्यामुळे स्वयंपाकघरात काही वास्तु नियम पाळणे आवश्यक आहे. स्वयंपाकघरात काही गोष्टी केल्याने देवी अन्नपूर्णा नाराज होते. त्यामुळे अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करण्यासाठी कोणते वास्तु नियम पाळायचे याबाबत आपण जाणून घेऊया.

भारतीय संस्कृतीमध्ये स्वयंपाक घराला विशेष महत्व आहे. स्वयंपाकघरात देवी अन्नपूर्णा निवास करत असल्याने स्वयंपाक घरात प्रत्येक गोष्ट वास्तु नियमानुसार करणे चांगले असते. असे केल्याने घरात सुखसमृद्धी येते तसेच माता अन्नपूर्णा प्रसन्न होते. देवीला प्रसन्न करण्यासाठी काही सोपे उपाय आज आपण जाणून घेऊया….

 

स्वयंपाकघरात चप्पल-बूट घालू नयेत-

वास्तु शास्त्रानुसार, स्वयंपाकघरात कधीही चप्पल किंवा बूट घालून जाऊ नयेत. असे केल्याने अन्नपूर्णा माता नाराज होते. घरामध्ये आर्थिक अडचणी येतात. धनधान्यात कमतरता येते. तसेच स्वयंपाकघराच्या आजूबाजूलासुद्धा चप्पल ठेवणे टाळावे.

 

खरकटी भांडी ठेऊ नयेत-

वास्तु शास्त्रानुसार, स्वयंपाकघर नेहमीच स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावे. स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेऊ नयेत. अनेक लोक स्वयंपाकघरात खरकटी भांडी तासंतास ठेवतात. परंतु असे केल्याने देवी अन्नपूर्णा नाराज होते.घरात नकारात्मकता प्रवेश करते. घरात सुखसमृद्धी येण्यास अडथळे येतात. त्यामुळे वेळच्या वेळी खरकटी भांडी स्वच्छ करणे गरजेचे असते. स्वयंपाकघरात स्वच्छता ठेवल्याने देवी अन्नपूर्णा प्रसन्न होते.

 

स्वयंपाकघरात भोजन करणे टाळा-

वास्तु शास्त्रानुसार स्वयंपाकघरात भोजन करणे टाळावे. कारण असे केल्याने वैवाहिक आयुष्यात अडचणी येतात. पतीपत्नीमध्ये वादविवाद निर्माण होतात. तसेच आर्थिक चणचण भासू शकते. त्यामुळे स्वयंपाक घरात भोजन करू नये.

 

नळाचे पाणी टपकने-

वास्तु नियमानुसार स्वयंपाकघरातील नळाचे पाणी टपकू देऊ नका. नळाचे पाणी टपकत असल्यास आर्थिक अडचणी येतात. पैशांचा विनाकारण खर्च वाढतो. आर्थिक स्थैर्य येण्यासाठी स्वयंपाकघरात नळाचे पाणी टपकू देऊ नका. नळ व्यवस्थित बंद करा.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)