तुम्हाला वाटते का की फिश अॅक्वेरियम ही फक्त एक सजावटीची वस्तू आहे? तर मग थांबा, वास्तुशास्त्रानुसार एक लहान अॅक्वेरियम देखील तुमच्या आयुष्यात मोठा बदल आणू शकते. माशांची सतत हालचाल केवळ पाहण्याला आराम देत नाही, तर त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक समृद्धीचा मार्गही मोकळा होतो. पण घरात फिश टॅंक ठेवतात काही नियम पाळले गेले पाहीजेत. नाहीतर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर झालेला आपल्याला दिसतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी…
फिश टॅंक ठेवण्याची योग्य दिशा
ईशान्य कोपरा
फिश टॅंक कुठे ठेवावा
फिश टॅंक लिविंग रूममध्ये ठेवल्यास कुटुंबासाठी शांत आणि आरामदायक वातावरण निर्माण होते. फिश टॅंक घरात प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला ठेवल्यास वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहते. वास्तुशास्त्रानुसार, फिश टॅंक किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये ठेवल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात. फिश टॅंकचे पाणी वेळोवेळी बदलणे आवश्यक आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरातील फिश टॅंकमध्ये माशाची विशिष्ट संख्या असावी. फिश टॅंकमध्ये ९ मासे ठेवणे शुभ मानले जाते, त्यात आठ सोनेरी तर एक काळ्या रंगाचा मासा असावा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)











