Vastu Tips For Money : घरात पैसा टिकत नाही? पहा कारणे आणि उपाय

Asavari Khedekar Burumbadkar

पैसा हा आजकाल माणसाच्या जीवनात सर्वात महत्वाचा बनला आहे. इतका महत्वाचा की पैसा असेल तरच माणसाला किंमत असते. त्यामुळे पैसा कमवण्यासाठी अनेकजण जीवाचं रान करतात दिवस-रात्र कष्ट करतात. परंतु इतकं सगळं करू नये अनेकांच्या हातात पैसा टिकत नाही. अनेकांच्या घरात किती पैसा आला तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो खर्च होतो. वास्तुशास्त्रानुसार यामागे घरातील वास्तुदोष (Vastu Tips For Money) कारणीभूत असू शकतो. म्हणूनच आज घरात पैसा न टिकण्याची कारणे काय आहेत आणि यावर उपाय काय असू शकतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

घरात पैसा न टिकण्याची कारणे

घरात पैसा का टिकत नाही याची अनेक कारणे असू शकतात, ज्यामध्ये वास्तु दोष (Vastu Tips) आणि ज्योतिषीय कारणांचा समावेश आहे जसे की घरात चुकीच्या ठिकाणी वस्तू ठेवणे, स्वच्छतेकडे लक्ष न देणे आणि चुकीच्या पद्धतीने पैसे कमवणे किंवा खर्च करणे. यातीलच काही प्रमुखांनी म्हणजे घराची तिजोरी चुकीच्या दिशेने ठेवणे घरातील नळ गळका असणे किंवा घरात बंद पडलेलं घड्याळ ठेवणे. याशिवाय स्वयंपाक घरातील उष्टी भांडी, कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढती भांडणे अशा अनेक कारणांनी घरात पैसा टिकत नाही.

उपाय काय?? Vastu Tips For Money

लक्ष्मीची पूजा करा: शुक्रवारी लक्ष्मी मातेची पूजा करा आणि तिला एक रुपयाचे नाणे आणि पाच पिवळ्या कवड्या अर्पण करा. दुसऱ्या दिवशी, ही नाणी लाल कापडात बांधून तिजोरीत ठेवा.

बंडल उपाय: अमावस्येच्या दिवशी, दुपारी १२ वाजता, एक पिवळा कापड आणि मूठभर मीठ एका बंडलमध्ये बांधा. नंतर, ते घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर, रस्त्याकडे तोंड करून, पितळेच्या खिळ्याने लटकवा. Vastu Tips For Money

कमळाचे फूल: घरातील आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळविण्यासाठी, शुक्रवारी देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा.

नारळ: घरात नारळ ठेवल्याने आर्थिक अडचणी कमी होतात आणि देवी लक्ष्मीचे आगमन होते असे मानले जाते.

मीठ उपाय: घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आणि संपत्ती आकर्षित करण्यासाठी, मातीच्या भांड्यात मीठ ठेवा आणि ते पूर्वेला ठेवा.

हळद आणि नाणे: जर घरात पैसे राहिले नाहीत तर देवी लक्ष्मीला एक नाणे अर्पण करा आणि ते पिठाच्या भांड्यात ठेवा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या