आपल्या भारतात वास्तुशास्त्राला (Vastu Tips) मोठं महत्त्व आहे. घराचं काम करत असताना किंवा आतील इंटिरियर करत असताना ते वास्तुशास्त्राप्रमाणेच करण्याकडे अनेकांचा कर असतो. त्यामागचं कारणही अगदी स्पष्ट आणि स्वच्छ आहे, वास्तुशास्त्रानुसार घराचे काम केल्यानंतर घरात सकारात्मक वातावरण निर्माण राहते तसेच कोणती आर्थिक अडचण होत नाही असं म्हटलं जातं. वास्तुशास्त्रात असे मानले जाते की तुमच्या घरात वास्तु तत्वांचे पालन केल्याने तुम्हाला अनेक समस्यांपासून संरक्षण मिळेल. आज आम्ही तुम्हाला असाच एक वास्तु उपाय सांगणार आहोत जो कापराशी संबंधित आहे…
जर तुमच्या घरात सतत नकारात्मक ऊर्जेचा अनुभव येत असेल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा. यामुळे नकारात्मकता दूर होईल आणि तुमच्या घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढेल. जर तुम्हाला आर्थिक समस्या येत असतील तर लवंगाने कापूर जाळा. यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारित. पैशाची कमी कधीही भासणार नाही. Vastu Tips

वास्तु दोषापासून मुक्तता मिळवा
जर तुमच्या घरात वास्तु दोषाच्या समस्या येत असतील तर त्या दूर करण्यासाठी तुम्हांला घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात कापूरचे तुकडे ठेवावे लागतील. या उपायाने तुम्हाला वास्तु दोषांपासून मुक्तता मिळू शकते.
कापूर कुठे ठेवावा ? Vastu Tips
वास्तूनुसार, तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर, देवघरात आणि तिजोरीवर कापूरचा तुकडा ठेवू शकता. बेडरूममध्ये कापूर ठेवल्याने तुम्हाला घरगुती त्रास दूर होण्यास मदत होऊ शकते. शिवाय, झोपताना उशीखाली कापूरचा तुकडा ठेवल्याने मानसिक शांती मिळते आणि चांगली झोप येते. घराच्या या भागात कापूर ठेवल्याने तुम्हाला वास्तुदोष आणि नकारात्मक उर्जेपासून मुक्तता मिळू शकते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)