वास्तुशास्त्रानुसार, (Vastu Tips) घरातील प्रत्येक वस्तूचा आपल्या जीवनातील उर्जेवर खोलवर परिणाम होतो. ही ऊर्जा सकारात्मक सुद्धा असू शकते आणि नकारात्मक सुद्धा असू शकते. वास्तुशास्त्रानुसार घरात काही वस्तू आणल्याने घराचे घरपण बदलते. त्याचे चांगले परिणाम ही बघायला मिळतात. अशीच एक वस्तू म्हणजे चांदीचा मोर …चांदीचा मोर म्हणजे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक… योग्य दिशेला चांदीचा मोर ठेवल्याने फक्त घरातील वास्तुदोषच दूर होत नाहीत तर उत्पन्नाचे नवनवीन मार्गही तयार होतात. परंतु चांदीचा मोर कुठे ठेवायचा ते आपण जाणून घेऊया.
देवघरात ठेवा चांदीचा मोर (Vastu Tips)
वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या देवघरात चांदीचा मोर ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा येते. असे मानले जाते की देवघरात चांदीचा मोर ठेवल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी राहते आणि मानसिक शांती मिळते.

तिजोरीत ठेवा चांदीचा मोर
अनेकदा आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु तरीही त्याचे अपेक्षित फळ मिळत नाही. तुमच्याही बाबतीत असं काही घडत असेल तर चांदीचा मोर तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरेल. वास्तुशास्त्रानुसार, (Vastu Tips) जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी चांदीचा मोर आणला आणि तो तुमच्या तिजोरीत किंवा लॉकरमध्ये ठेवला तर तुमचे नशीब फळफळते आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळते.
व्यावसायिकांसाठी उपयुक्त
जर तुमच्या व्यवसायात वारंवार अडथळे किंवा तोटा होत असेल, तर तुमच्या ऑफिस डेस्क किंवा अभ्यासाच्या टेबलावर चांदीचा मोर ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे कामाच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि व्यवसायाच्या प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध होतात.
बेडरूम मध्ये ठेवा चांदीचा मोर
पती-पत्नीमधील वारंवार होणारे वाद सोडवण्यासाठी चांदीचा मोर खूप प्रभावी मानला जातो. तो घरात नकारात्मकता कमी करतो आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवाद वाढवतो. बेडरूमच्या उत्तर दिशेने तो ठेवणे शुभ मानले जाते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)