Ravan Dahan : रावण दहनाच्या राखेचा असा करा वापर; वाईट नजरेपासून होईल सुटका

Asavari Khedekar Burumbadkar

आज विजयादशमी दसरा… हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देशभरात साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशीच दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला होता आणि प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता. त्यामुळे आजच्या दिवशी या दोन्ही घटनांची विशेष आठवण केली जाते. आपल्या भारतात दसऱ्याच्या दिवशी रावणाचे प्रतीकात्मक पुतळे जाळले जातात (Ravan Daha). आणि विजयादशमी साजरी केली जाते. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की, प्राचीन मान्यतेनुसार, रावणाच्या राखेचा वापर करून काही उपाय केले जातात जे चांगले परिणाम देऊ शकतात.

जर तुमच्या कुटुंबातील एखाद्याला वाईट नजरेने ग्रासले असेल किंवा सतत आर्थिक समस्या येत असतील, तर या दिवशी रावण दहनाच्या राखेचा वापर करून तुम्ही यापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकता. जर तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी सातत्याने नवनवीन समस्या येत असतील, तर दसऱ्याच्या दिवशी रावणाची राख हातात घ्या, ती स्वतःभोवती फिरवा आणि नंतर फेकून द्या. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते आणि तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते याशिवाय तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते.

आर्थिक संकटावर उपाय – Ravan Dahan

आजकाल पैशाला खूप महत्त्व आहे. पैसा असेल तरच माणसाला किंमत आहे. अशावेळी जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर रावण दहनातील उरलेले लाकूड तुमच्या घराच्या तिजोरीत ठेवा. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. तसेच अचानक धनलाभ होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही.

कामाच्या ठिकाणी यश मिळवण्यासाठी उपाय

जर तुम्हाला कठोर परिश्रम करूनही यश मिळत नसेल तर रावण दहनाच्या (Ravan Dahan) दिवशी राख लाल रंगाच्या गुच्छात ठेवा आणि नंतर ती तुमच्या ऑफिसच्या बॅगेत ठेवा. यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात आणि कामाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढू शकतो.

घरात वास्तुदोष दूर करण्यासाठी उपाय

जर तुमच्या घरात सतत भांडणे होत असतील तर रावण दहनातील राख तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा. यामुळे वास्तुदोष दूर होण्यास मदत होऊ शकते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या