Right direction to install a wind chime: वास्तुशास्त्र आणि रत्न शास्त्राप्रमाणेच फेंगशुई शास्त्रदेखील प्रचलित झाले आहे. प्राचीन काळापासून पाश्चिमात्य देशांमध्ये फेंगशुई शास्त्र अवलंबले जात आहे. हे एक चिनी शास्त्र आहे. अलीकडे भारतातसुद्धा फेंगशुई शास्त्राचा वापर केला जात आहे. यामध्ये घरामध्ये अनेक वस्तू ठेवण्याचा सल्ला दिला जातो. या वस्तू घराची शोभा तर वाढवतातच शिवाय सकारात्मक प्रभावसुद्धा पाडतात.
घराच्या सजावटीमध्ये अनेक वस्तू लागतात. तर अशा काही वस्तू आहेत ज्या घरात सजावटीसोबतच सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण करतात. फेंगशुईमध्ये अशा अनेक वस्तू आहेत ज्या सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात. त्यातीलच एक म्हणजे विंड चाइम होय. आजकाल अनेक घरामध्ये आणि ऑफिसमध्ये विंड चाइम लावलेले दिसून येतात. आज आपण विंड चाइमचे फायदे जाणून घेऊया….
फेंगशुई शास्त्रामध्ये विंड चाइमला विशेष महत्व आहे. या शास्त्रानुसार विंड चाइम ५ तत्वांचे प्रतीक आहे. यामध्ये हवा, पृथ्वी, अग्नी, पाणी आणि धातू या पाच तत्वांचा समावेश होतो. जेव्हा वारा सुटतो तेव्हा विंड चाइममधून एक मनाला भावणारी धून ऐकू येते. या आवाजाला ची असे म्हणतात. ची म्हणजे प्रकृतीची पाच तत्वे होय.
घरात सुखसमृद्धी येते-
फेंगशुईनुसार, विंच चाइम लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जेसोबत सुखसमृद्धी येते. विंड चाइमच्या अस्तित्वाने तुमच्या नशीब उजळून निघते. शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यामुळे अनेकजण विंड चाइम घरामध्ये, ऑफिसमध्ये लावतात.
विंड चाइम लावण्याची योग्य दिशा-
फेंगशुई शास्त्रानुसार विंड चाइम नेहमीच योग्य दिशेत लावणे आवश्यक असते. त्यानुसार विंड चाइम नेहमीच पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेत लावावे. विंड चाइम मेटलचे असेल तर ते दक्षिण किंवा दक्षिण-पूर्व दिशेत लावावे.
विंड चाइम लावण्याचे योग्य स्थान-
फेंगशुईनुसार विंड चाइम नेहमी घरात ज्याठिकाणी वारा चांगला येतो त्याठिकाणी लावावे. बाल्कनीमध्ये विंड चाइम लावणे एकदम चांगले असते. परंतु इतर ठिकाणी ते लावताना काळजी घ्या कि ते इतर गोष्टींना सतत स्पर्श करणार नाही.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





