मोठी बातमी! उल्हासनगरच्या शासकीय महिला सुधारगृहातून १२ महिला फरार; पोलिसांकडून शोध मोहिम सुरु

उल्हासनगरच्या या शासकीय महिला सुधारगृहात आणून ठेवण्यात आलं होतं. यातील काही महिलांनी काल (शनिवारी) रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन भिंतीवरून उडी मारून तर काही महिलांनी मुख्य प्रवेशद्वाराहून उडी मारून फरार झाल्या.

Ulhasnagar – ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरच्या शासकीय महिला सुधारगृहातून महिलांनी पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी यातील सहा महिलांना शोधून काढल आहे. तर सहा महिला अजूनही फरार आहेत. तब्बल सहा महिलांच्या पलायनाने खळबळ उडाली असून सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अंधाराचा फायदा घेऊन महिला फरार…

मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत पीटा कायद्यानुसार कारवाई केल्यानंतर या महिलांना उल्हासनगरच्या या शासकीय महिला सुधारगृहात आणून ठेवण्यात आलं होतं .यातील काही महिलांनी काल (शनिवारी) रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन भिंतीवरून उडी मारून तर काही महिलांनी मुख्य प्रवेशद्वाराहून उडी मारून त्या फरार झाल्या. दरम्यान, या आधी याच परिसरात असलेल्या मुलींच्या वसतिगृहातून अनेकदा मुली पळून गेल्याच्या घटना घडल्यात. यानंतर आता उल्हासनगरच्या शासकीय महिला सुधारगृहातून १२ महिला फरार झाल्याने खळबळ उडाली असून, सुरक्षेवरुन टिका करण्यात येत आहे.

पोलिसांकडून शोध मोहिम सुरु

दुसरीकडे पोलिसांनी यातील सहा महिलांना शोधून काढल आहे. तर सहा महिला अजूनही फरार आहेत. उल्हासनगर पोलिसांनी सहा महिलांना शोधले असले, तरी अजूनही सहा महिला अद्याप बेपत्ता आहेत.  त्यात आता शासकीय महिला वस्तीगृहातील महिला पळून गेल्याने इथल्या सुरक्षा संदर्भाचा प्रश्न अधिकच गंभीर बनलाय. या प्रकरणी पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. दरम्यान ,इतर सहा महिलांचा अद्यापही शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच युद्ध पातळीवर सहा महिलांना शोध मोहिम सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News