तब्बल 17 वर्षांनंतर मालेगाव बॉम्ब ब्लास्ट खटल्याचा निकाल आज लागणार, संपूर्ण देशाचे लक्ष…

19 एप्रिल रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाचे न्यायाधीश एल. के. लाहोटी यांनी या खटल्याची सुनावणी पूर्ण करत आपला निकाल राखून ठेवला होता. यानंतर आज निकालाचे वाचन होणार आहे.

Malegaon blast case तब्बल 17 वर्षांपूर्वी म्हणजे 2008 मध्ये झालेल्या मालेगाव ब्लास्ट खटल्याचा निकाल आज लागणार आहे. एका मशिदीबाहेर झालेल्या या स्फोटात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर एकूण शंभरच्यावर जखमी झाले होते. यानंतर हिंदू-मुस्लिम वाद चिघळण्याची शक्यता झाली होती. दरम्यान, हा खटला गेली १७ वर्ष सुरु आहे. यानंतर आज तब्बल 17 वर्षांनंतर मालेगाव ब्लास्ट खटल्याचा निकाल लागणार, आहे, त्यामुळं याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

पहिल्यांदाच हिंदू दहशतवाद पसरवण्याचा आरोप…

दरम्यान, या खटल्यात हायप्रोफाईल आरोपी, फितूर झालेले महत्त्वाचे साक्षीदार, बदललेल्या तपासयंत्रणा, बदललेले न्यायाधीश या सर्व घडामोडींमुळे हा खटला सतत देशभरात चर्चेत राहिलाय. या प्रकरणानंतर पहिल्यांदाच हिंदू दहशतवाद पसरवण्याचा आरोप करण्यात आला होता. 19 एप्रिल रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाचे न्यायाधीश एल. के. लाहोटी यांनी या खटल्याची सुनावणी पूर्ण करत आपला निकाल राखून ठेवला होता. यानंतर आज निकालाचे वाचन होणार आहे.

आरोपींच्या भवितव्याचे काय होणार?

या प्रकरणात लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, भाजपाच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी उर्फ स्वामी अमृतानंद, सुधाकर चुतर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश असल्याचे बोलले जाते. यांच्याविरोधात दहशतवाद विरोधी कायदा आणि यूएपीए अंतर्गत खटला चालवण्यात आलाय. हत्येशी संबंधित आयपीसी कलम, विस्फोटक कायदा, शस्त्रास्त्र कायदा तर श्याम साहू,  संदीप डांगे, प्रवीण टकल्की व रामजी कालसंग्रा यांना फरार आरोपी दाखवण्यात आलं आहे. त्यामुळं आज या आरोपींचे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News