Crime News: धक्कादायक! नागपुरात 12 वर्षीय मुलीवर लॉजमध्ये अत्याचार; दोन आरोपी अटकेत

साताऱ्याच्या फलटणमधील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाचा आता नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरात २ नराधमांनी १२ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले...

राज्यातील महिला, तरूणींसह आता लहान मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नराधमांच्या नजरेतून लहान मुली देखील सुटताना दिसत नाहीत. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवरील दोन नराधमांनी सामुहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साताऱ्यातील फलटणमधील डॉक्टर हत्महत्या प्रकरण ताजे असतानाचा नागपूरमध्ये ही संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे नागपूर परिसरात संतापाची लाट आहे.

12 वर्षीय मुलीवर लॉजमध्ये अत्याचार

नागपूर जवळील भिलगाव परिसरात गुरुवारी सदर घटना घडली.  दोन्ही आरोपी मुलीला लॉजवर घेऊन गेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेचे व्हिडीओ बनवून त्यांनी मुलीला कोणालाही हे सांगायचे नाही, व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी दिली. मुलीने घरी आल्यावर घडलेलं सर्व कुटुंबियांना सांगितले. तिच्या पालकांनी हे कळल्यावर तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि दोन्ही आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आरोपींवर बलात्कार, पॉक्सोच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. हे दोन्ही आरोपी गुन्हेगारीच्या क्षेत्राचे असून त्यांच्यावर या पूर्वी देखील अनेक गुन्हा दाखल केले आहे. पोलीस या प्रकरणी लॉजच्या मालकाशी चौकशी करण्यात असल्याचे सांगितले आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

लॉज मालक अडचणीत येणार का?

या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. 12 वर्षांची मुलगी लॉजवर गेली कशी? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लॉज मालकाने अल्पवयीन मुलीला लॉजवर घेऊन जाण्याची परवानगी दिली कशी? असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. पोलिसांच्या तपासात या प्रश्नांची उत्तरे अद्यापही समोर आलेली नाहीत. दोन्ही नराधमांसोबत लॉज मालकालाही या प्रकरणात शिक्षा होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे आता आगामी काही दिवसांत या प्रकरणात नेमकी कुणावर आणि अशी कारवाई होते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News