दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका मोठ्या कारवाईत कुख्यात गुन्हेगारी सिंडिकेट गोल्डी बरार, रोहित गोडारा आणि वीरेंद्र चरण यांच्यासाठी काम करणाऱ्या दोन शूटरांना अटक केली आहे. (Delhi Police Action Against Goldy Brar Gang). ही कारवाई जैतपूर-कालींदी कुंज रस्त्यावर झालेल्या एका एन्काउंटरनंतर करण्यात आली. प्राथमिक चौकशीत समोर आले की, या दोघांनाही सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या एका प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची हत्या करण्याचा टास्क दिला गेला होता.
मुनव्वर फारूकी होते लक्ष्य? Delhi Police Action Against Goldy Brar Gang
अधिकृतरीत्या दिल्ली पोलिसांनी हल्ल्याच्या संभाव्य टार्गेटचे नाव जाहीर केले नसले तरी, अनेक माध्यमांनी दावा केला आहे की प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस २०२४ चे विजेते मुनव्वर फारूकी यांच्यावरच हल्ला होण्याची शक्यता होती. फारूकी यांचे इंस्टाग्रामवर १४.२ मिलियन फॉलोअर्स असून ते विविध सोशल मीडियावर अति सक्रिय आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी मुंबई व बेंगळुरू येथे फारूकी यांच्यावर लक्ष ठेवत त्यांच्या हालचालींचा सखोल अभ्यास केला होता. Delhi Police Action Against Goldy Brar Gang

अटक करण्यात आलेल्या आरोपींची माहिती
अटकेत घेतलेले आरोपी म्हणजे राहुल (पानीपत, हरियाणा) आणि साहिल (भिवानी, हरियाणा) हे असून एन्काउंटरदरम्यान दोघांनाही पायात गोळ्या लागल्या आहेत. यामध्ये राहुल हा आधीच यमुनानगर (हरियाणा) येथे २०२४ मध्ये झालेल्या ट्रिपल मर्डर प्रकरणात फरार होता. त्याच्यावर अटक वॉरंट होते. दिल्ली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कालिंदी कुंज परिसरात सापळा रचण्यात आला.
गुरुवारी पहाटे ३ वाजता, एक संशयित मोटरसायकल थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार करत दोघांनाही पायात जखमी करत ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलिसांनी मोटरसायकल व शस्त्रे जप्त केली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. गुन्हेगारी जगतातील ही गंभीर कारवाई दिल्ली पोलिसांसाठी मोठे यश मानले जात आहे. याप्रकरणात आणखी आरोपी आणि सूत्रधार बाहेर येण्याची शक्यता असून तपास अधिक खोलात सुरू आहे.