Bombay High Court threatening email – काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली होता. यानंतर मुंबई पोलिसांना काही काळासाठी मुंबई उच्च न्यायालय रिकामे केले होते. तसेच परिसरात पोलीस यंत्रणा सतर्क केली होती. मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाला धमकीचा ई-मेल आला आहे, त्यामुळं पोलिस सतर्क झाले असून, झाडाझडती सुरु आहे. तसेच परिसरात बॉम्ब शोधक पथकाच्या साह्याने शोध मोहिम सुरु आहे.
धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरु
दुसरीकडे धमकीचा ई-मेल मिळताच बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीने न्यायालय आणि परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार या शोध मोहिमेदरम्यान काहीही संशयास्पद आढळलेले नाही. दरम्यान, सध्या पोलीस धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेताहेत. असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. आज (शुक्रवारी) मुंबई उच्च न्यायालयात बॉम्ब ठेवण्यात आल्या असल्याचा ई-मेल आला आहे. असे समजताच मुंबई पोलिसांना तत्काळ उच्च न्यायालय रिकामे केले. तसेच परिसरातील सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली. विशेष खबरदारी म्हणून उच्च न्यायालयात प्रवेश करणाऱ्या लोकांना आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांची, लोकांची कसून तपासणी आणि चौकशी करण्यात येत आहे.

परिसरात पोलिस फौजफाटा वाढवला
दरम्यान, उच्च न्यायालयाला धमकी मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली होती. पण तेव्हाही काहीही सापडले नव्हते. यानंतर आताही धमकी आल्यानतंर मुंबई पोलिसांना काहीही संशयास्पद आढळले नाही. परंतू मुंबई पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाला धमकीचा मेल आला आहे. या धमकीच्या मेलनंतर मुंबई पोलिसांनी संपूर्ण उच्च न्यायालय रिकामे आले. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात तपासणी केली. परंतू पोलिसांना काहीही संशयास्पद आढळले नाही.











