बुधवारी माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना पुन्हा एकदा सामूहिक बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. स्पीड पोस्टद्वारे त्यांच्या अमरावती येथील कार्यालयात धमकीचे पत्र पाठवण्यात आले. पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही उल्लेख असून अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला आहे. या धमकी प्रकरणाबाबत आता नवे खुलासे होताना दिसत आहेत.
पत्र पाठविणारा ‘तो’ तरूण हैदराबादचा
भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना हैदराबादहून स्पीड पोस्टवरून सामूहिक बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी मिळाली. पत्रात अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा आहे. पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख आहे. हे पत्र हैदराबादमधील जावेद नावाच्या व्यक्तीने पाठवल्याचे वृत्त आहे. नवनीत यांच्या पीएने राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पत्रामागील हेतू पोलिस तपासत आहे. आरोपी जावेदचा शोध सुरू करण्यात आला आहे.

पत्र पाठवणाऱ्याने नवनीत राणांना त्यांच्या मुलासमोर बलात्कार करण्याची धमकी दिली आहे. पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या धमकीत गंभीर परिणामांची धमकीही देण्यात आली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की नवनीत राणा यांना यापूर्वी अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहे. या पत्रामुळे पुन्हा एकदा राणांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नवनीत राणांच्या जीवाला खरंच धोका?
पत्रात आरोपीने केवळ नवनीत राणा यांनाच धमकावले नाही, तर त्यांच्या मुलांसमोरच त्यांच्यावर बलात्कार करण्याची भाषाही वापरली आहे. तसेच गंभीर परिणाम भोगण्याचीही चेतावणी दिली आहे. यापूर्वीही नवनीत राणा यांना अनेकदा धमकीचे फोन आणि संदेश आले आहेत. पोलीस पथके आता हैदराबादहून पाठवलेल्या टपालाचे पुरावे तपासत आहेत. अमरावती आणि हैदराबाद पोलीस मिळून या प्रकरणावर काम करत आहेत.
यापूर्वीही १२ ऑक्टोबर २०२३ रोजी नवनीत राणा यांना अशाच प्रकारचे धमकीचे पत्र मिळाले होते. त्या पत्रात नवनीत यांना सामूहिक बलात्काराची धमकी देण्यात आली होती. तसेच त्यांच्या घरासमोर गाय कापली जाईल, असेही म्हटले होते. पत्र पाठवणाऱ्याने स्वतःचे नाव आमिर सांगितले होते. त्याने १० कोटी रुपयांची खंडणीही मागितली होती. तसेच ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असेही लिहिले होते. आरोपीने पत्रात आपला फोन नंबरही लिहिला होता. त्यामुळे नवनीत राणांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.











