फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात नवे खुलासे, एक खासदार, पीए आणि पोलीस अधिकारी…विषय काय?

फलटण उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात आता सातत्याने नवनवे खुलासे होताना दिसत आहे. त्यामुळे सध्या हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरलेले आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयात महिला डॉक्टरने आत्महत्या केली. मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली आहे. या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने आपल्यावर बलात्कार झाल्याचं लिहिलंय. त्यात तिने पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेचं नाव लिहिलंय. पोलीस उपनिरीक्षक बदनेनं चारवेळा बलात्कार केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. तसंच प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीनेही मानसिक त्रास दिल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. पीएसआय बदनेचे निलंबन करण्यात आले आहे. मात्र या प्रकरणात एक खासदार आणि त्याच्या पीएचा काही संबंध असल्याची चर्चा देखील आता या निमित्ताने सुरू झाली आहे.

दोषींना फाशीची शिक्षा देण्याची कुटुंबाची मागणी

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयात महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे. तिच्यावर एका पोलीस उपनिरीक्षकाने सातत्याने बलात्कार केल्याचं समोर आलं. तसेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी तिच्यावर वरिष्ठांचा दबाव असल्याचं सुसाईड नोटमधून समोर आलं. पीडित महिला डॉक्टर ही मूळची बीडच्या वडवणी तालुक्यातील होती. तिच्या मृत्यूची बातमी समजताच गावात शोकाकुल परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी जो कुणी दोषी असेल त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे.

पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेचे निलंबन

मुख्यमंत्र्यांनी  संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश दिले. यानंतर गोपाळ बदनेचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

मृत महिला डॉक्टरच्या भावाचे खळबळजनक आरोप

या मृत महिला डॉक्टरच्या भावाने खळबळजनक आरोप केले आहेत की, या महिलेवर पीएम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यासाठी खासदारांचे नाव माहिती नाही. मात्र त्याचे पीए तिच्या भेटीला आले होते. त्यांच्याकडून दबाव टाकला जात होता. त्यांनी खासदारांना फोन लावून तिच्याशी बोलणं देखील करून दिलं होतं. हे खासदार फलटण भागातील आहेत. तिने या प्रकरणी 2-3 महिन्यांपूर्वीच तक्रार दिली होती. वरिष्ठांना देखील याबाबत माहिती देत आपल्यावर जीवन संपवण्याची वेळ येऊ शकते. असं सांगितलं होतं, पण त्याची दखल घेतली गेली नाही. असा खळबळजनक आरोप या मृत महिला डॉक्टरच्या भावाने केला आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News