प्रेक्षकांसाठी शुक्रवार म्हणजे नव्या चित्रपट व वेब सिरीज पाहण्याचा खास दिवस! मागील आठवड्यात ओटीटी आणि थिएटरवर दमदार रीलिझ झाल्यानंतर, या आठवड्यातही मनोरंजनाची लाट येणार आहे. १२ सप्टेंबर, शुक्रवारच्या दिवशी ओटीटी आणि सिनेमागृहांमध्ये एकूण नवीन चित्रपट आणि सिरीज प्रदर्शित होणार होणार आहे!
चला तर पाहूया, या आठवड्यात कोणते चित्रपट व वेब सिरीज तुमचं लक्ष वेधणार आहेत:

ओटीटीवर येणाऱ्या खास सिरीज आणि चित्रपट
सैयारा (Netflix)
बॉक्स ऑफिसवर ५७० कोटींहून अधिक कमाई करणारी ‘सैयारा’ आता नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. अनन्या पांडेचा भाऊ अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या डेब्यूने सजलेली ही चित्रपट प्रेमकथेसोबत थरारही देतो. मोहित सूरी दिग्दर्शित ही फिल्म १२ सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
यू अँड एव्हरीथिंग एल्स (Netflix)
कोरियन ड्रामा प्रेमींना खास ट्रीट! ही वेब सिरीज दोन महिलांच्या तणावपूर्ण नात्यावर आधारित असून, त्यांच्या नात्यातील गुंतागुंत उलगडत जाते.
रेम्बो इन लव्ह (Jio Cinema / Hotstar)
तेलुगु भाषेतील ही कॉमेडी-ड्रामा फिल्म एका बिझनेसमनच्या आयुष्याभोवती फिरते, जो दिवाळखोरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, पण गुंतवणूकदार म्हणून त्याच्याच गर्लफ्रेंडचं आगमन सगळं काही बदलून टाकतं.
डू यू वाना पार्टनर? (Amazon Prime Video)
तमन्ना भाटिया, डायना पेंटी आणि नकुल मेहता यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या कॉमेडी फिल्ममध्ये दोन मैत्रिणी पुरुषप्रधान उद्योगात स्वतःचं बीयर ब्रँड सुरू करण्याचा प्रयत्न करतात.
मेलेडिक्शन्स (Netflix)
एक जबरदस्त क्राईम थ्रिलर! उत्तर अर्जेंटिनामधील गव्हर्नरच्या मुलीच्या अपहरणावर आधारित ही कथा राजकारण, कुटुंब आणि नैतिकतेमधील संघर्ष उलगडते.
द रिचुअल्स (Lionsgate Play)
“द कंज्यूरिंग” चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! अँटी-पॉझेशन एक्सॉर्सिझमवर आधारित ही हॉरर फिल्म एका तरुण मुलीवर घडलेल्या सत्यघटनेवर बेतलेली आहे.
एक चतुर नार
दिव्या खोसला कुमार आणि नील नितिन मुकेश यांचा डार्क कॉमेडी ड्रामा. एका साध्या दिसणाऱ्या मुलीची बॉसच्या राजांवर चालणारी ब्लॅकमेलिंग ही कथा एका वेगळ्याच प्रकारच्या सस्पेन्समध्ये घेऊन जाते.