Nayantara Birthday: अभिनेत्री नयनताराला पतीने वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून दिली आलिशान कार!

Rohit Shinde

आपल्या अभिनयाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पहिल्याच चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये हिट झाली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये ती पहिल्या क्रमांकावर आहे. नयनताराचा पती विग्नेश याने तिला वाढदिवसाचं गिफ्ट दिलं आहे. त्याने तिला तब्बल 10 कोटींचं गिफ्ट दिलं आहे. ज्याचा फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

नयनताराला गिफ्ट मिळाली आलिशान कार

अभिनेत्री नयनतारा 18 नोव्हेंबर 2025 रोजी 41 वर्षांची झाली आहे. दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील सर्वात महागड्या अभिनेत्रीचा यंदाचा वाढदिवस खूपच खास होता. अभिनेत्रीला तिचा पती आणि दिग्दर्शक विग्नेश शिवनने वाढदिवशी आलिशान कार भेट दिली आहे. विग्नेश शिवनने नयनताराला रॉल्स रॉयस ही कार गिफ्ट केली आहे. विग्नेशनने नुकतेच सोशल मीडियावर नव्या कारसोबतचे फोटो शेअर केले आहेत. कारचे फोटो शेअर करत त्याने एक खास नोटदेखील लिहिली आहे. या फोटोंमध्ये विग्नेश आणि नयनतारासोबत त्यांची मुलंदेखील दिसत आहेत.

पती विग्नेशकडून नयनताराला महागडं गिफ्ट

विग्नेश शिवनने नयनताराला भेट दिलेल्या आलिशान कारची किंमत 10 कोटी रुपये आहे. त्यामुळे वाढदिवसाला अभिनेत्रीला चांगलच महागडं गिफ्ट मिळालं आहे. नयनतारा आणि विग्नेश 2022 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. 2015 मध्ये ‘नानुम राउडी धान’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नयनतारा आणि विग्नेश यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती. एखाद्या सिनेमाप्रमाणे त्यांची लव्हस्टोरीदेखील फिल्मी आहे.

नयनताराचा दक्षिणेतील सिनेसृष्टीत प्रभावा

नयनतारा सध्या आपल्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चिरंजीवी, बालकृष्ण आणि यश यांच्या आगामी चित्रपटात नयनतारा लवकरच झळकणार आहे. तसेच अनेक तमिळ आणि मल्याळम सिनेमेदेखील तिच्या पाइपलाईनमध्ये आहेत. नयनताराचा समावेश साऊथच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये केला जातो. तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांतील चित्रपटांत तिने प्रामुख्याने काम केलं आहे. तसेच 2023 मध्ये रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाच्या माध्यमातून नयनताराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात अभिनेत्रीने आपल्या अॅक्शन अंदाजाने सर्वांना थक्क केलं.

ताज्या बातम्या