घटस्फोटाच्या 4 वर्षांनंतर समंथाने देवळात उरकलं दुसरं लग्न; समंथाचा दुसरा नवरा राज निदिमोरू काय करतो ?

साऊथ स्टार समांथा रुथ प्रभू हिनं बॉयफ्रेंड राज निदिमोरूसोबत लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. आज हा विवाहसोहळा पार पडला.

अभिनेता नाग चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजचा दिग्दर्शक राज निदिमोरूशी दुसरं लग्न केल्याची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही काळापासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. आज 1 डिसेंबर 2025 रोजी पहाटे कोइंबतूर इथल्या ईशा फाऊंडेशनच्या लिंग भैरवी मंदिरात त्यांनी लग्न केल्याचं कळतंय. या लग्नाला फक्त 30 पाहुणे उपस्थित होते.

समंथा आणि राज निदिमोरू लग्नाच्या बंधनात

साऊथ स्टार समांथा रुथ प्रभू हिनं बॉयफ्रेंड राज निदिमोरूसोबत लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. आज हा विवाहसोहळा पार पडला. समांथानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या आयुष्यातली ही एक खास अपडेट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. समांथानं तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. हे फोटो शेअर करताना तिनं काहीच न लिहिता फक्त लग्नाची तारीख लिहिली आहे. 01.12.2025 असं कॅप्शन तिनं या फोटोवर लिहिलं आहे. या फोटोवर तिच्या चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आलाय.

समांथा आणि राज गेल्या काही काळापासून एकमेकांच्या एकमेकांच्या आयुष्यात आहेत. समांथा आणि राज यांनी एकत्र केलेला पहिला प्रोजेक्ट म्हणजे, मनोज बाजपेयीची सीरिज- ‘द फॅमिली मॅन 2’. या सीरिजचं दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केलं होतं. याच काळात समांथाचा घटस्फोट झाला. यानंतर समांथा आणि राज अनेकदा एकत्र दिसले होते. त्यांनी अनेकदा एकत्र फोटो शेअर केले होते. मात्र नात्याची कबुली मात्र दिली नव्हती. अखेर आता त्यांनी लग्न करत त्यांच्या नात्याबद्दल सगळ्यांना सांगितलं.

राज निदिमोरूच्या आधीच्या पत्नीची पोस्ट चर्चेत 

दरम्यान, राजची माजी पत्नी श्यामली डे हिने लग्नादरम्यान सोशल मीडियावर एक गूढ पोस्ट शेअर केली. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये, राजची माजी पत्नी लिहिते, ‘हताश लोक हताश गोष्टी करतात.’ आता, ही पोस्ट आल्यानंतर, राज खरोखरच विवाहित आहे का आणि त्याच्या माजी पत्नीलाही याची जाणीव आहे का याबद्दल अधिक चर्चा सुरू झाली आहे. समांथाबद्दल बोलायचे झाले तर, तिचे पूर्वी नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यशी लग्न झाले होते, परंतु लग्नाच्या चार वर्षांनंतर ते वेगळे झाले. नागा चैतन्यने शोभिता धुलिपालाशीही पुनर्विवाह केला आहे आणि आता समांथाने फॅमिली मॅनच्या दिग्दर्शकासोबत स्थायिक झाले आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News