Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्याने आभिषेक सोबत लग्नाचा निर्णय घेताना ‘या’ व्यक्तीचा घेतला होता सल्ला! १७ वर्षांनंतर मोठा खुलासा

अभिषेकने प्रपोज केल्यानंतर ऐश्वर्या राय थेट आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थी येथे पोहोचली होती. येथेच तिने श्री सत्य साई बाबा यांची वैयक्तिक भेट घेतली आणि आपल्या लग्नासंदर्भात मार्गदर्शन मागितले

Aishwarya Rai Bachchan : बॉलिवूडची ग्लोबल आयकॉन म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनय, सौंदर्य आणि लोकप्रियतेसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक हालचाल चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरते. अभिषेक बच्चनसोबतच्या तिच्या लग्नाबाबत वर्षानुवर्षे अनेक दावे-प्रतिदावे होत आले, मात्र आता समोर आलेली माहिती एका वेगळ्याच गोष्टीकडे संकेत देते.

कोणाला विचारून ऐश्वर्याने लग्न केलं ?

ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे २००७ मध्ये मोठ्या थाटात झालेले लग्न त्या काळातील सर्वाधिक चर्चेत असलेला सेलिब्रिटी सोहळा मानला जातो. पण या निर्णयामागे एक अद्भुत आणि भावनिक क्षण दडल्याचा दावा आता पुढे येत आहे. सूत्रांच्या मते, अभिषेकने प्रपोज केल्यानंतर ऐश्वर्या राय थेट आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थी येथे पोहोचली होती. येथेच तिने श्री सत्य साई बाबा यांची वैयक्तिक भेट घेतली आणि आपल्या लग्नासंदर्भात मार्गदर्शन मागितले. काही दिवसांपूर्वीच शताब्दी समारंभासाठी ऐश्वर्या (Aishwarya Rai Bachchan) त्याच स्थळी उपस्थित होती आणि आपल्या भाषणात तिने साई बाबांबद्दल असलेली खोल श्रद्धा उघडपणे व्यक्त केली. तिच्या आयुष्यातील अनेक मोठे निर्णय ती त्यांच्या आशीर्वादाने घेत असल्याचे ती मंचावरून नमूद करताना दिसली. यामुळेच ऐश्वर्या-अभिषेक विवाहाचा मार्ग प्रत्यक्षात येथेच निश्चित झाला होता, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

अखेर लग्नाचा निर्णय पक्का –

अभिषेकच्या प्रस्तावानंतर झालेली ही गुप्त भेट आणि त्यानंतर साई बाबांनी दिलेला सकारात्मक संकेत या दोन्ही घटना अभिनेत्रीच्या आयुष्याला निर्णायक वळण देणाऱ्या ठरल्या. त्याच क्षणी ऐश्वर्याने (Aishwarya Rai Bachchan) अभिषेकसोबत नवा प्रवास सुरू करण्याचा निर्णय पक्का केला, असे जवळच्या लोकांकडून समजते. यापूर्वी ऐश्वर्याचे सलमान खानसोबतचे नाते आणि त्याचा अत्यंत वाईट शेवट हे सर्वत्र चर्चेत होते. त्या कठीण काळानंतर काहीच वर्षांत अभिषेकसोबत तिचे आयुष्य नव्याने फुलले. मात्र या संपूर्ण प्रवासात अध्यात्मिक मार्गदर्शन तिच्यासाठी किती महत्त्वाचे होते, याचा ठसा आजही तिच्या वागण्यात दिसून येतो. येथून एक गोष्ट स्पष्ट होते बॉलिवूडच्या ग्लॅमरपासून दूर, सावलीत राहिलेली ही आध्यात्मिक कथा ऐश्वर्या-अभिषेक यांच्या वैवाहिक जीवनाची खरी पायाभरणी ठरली. आणि त्याचा खुलासा आजही चाहत्यांना तितकाच उत्सुक करणारा आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News