बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि सुसंस्कृत कपल अजय देवगन आणि काजोल यांचा मुलगा युग देवगनने आज 13 सप्टेंबर 2025 रोजी आपला 15 वा वाढदिवस साजरा केला. (Ajay Devgn Kajol Son Birthday) या खास दिवशी अजय आणि काजोल दोघांनीही आपल्या मुलावर भरभरून प्रेम व्यक्त करत खास पोस्ट शेअर केल्या आहेत, ज्या सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.
अजय देवगनने शेअर केला युगचा ‘सूटेड-बूटेड’ लूक- Ajay Devgn Kajol Son Birthday
अजय देवगनने युगचा एक आकर्षक फोटो एक्स (Twitter) वर शेअर करत लिहिलं –”माझा सर्वात स्ट्रॉंग क्रिटिक आणि माझा सगळ्यात सॉफ्ट कॉर्नर. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, माय बॉय. लव्ह यू लॉट्स!” युगचा हसरा, कूल अंदाज चाहत्यांना देखील खूप भावला आहे. अनेक फॅन्सनी युगला शुभेच्छा देत त्याचं कौतुक केलं आहे. एका युझरने लिहिलं – “अजय सर, युग हुबेहूब तुमच्यासारखा दिसतो!” Ajay Devgn Kajol Son Birthday

काजोलचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
काजोलनेही एक व्हिडीओ शेअर करत युगबद्दलच्या भावना मोकळ्या केल्या आहेत. या व्हिडीओमध्ये अजय आणि युग फॉर्मल सूटमध्ये एकत्र चालताना दिसतात. हा व्हिडीओ बहुधा त्यांची मुलगी निसा देवगनच्या ग्रॅज्युएशन सेरेमनी दरम्यानचा आहे. या व्हिडीओसोबत काजोलने लिहिलं –”युग देवगन आज 15 वर्षांचा झाला आहे. अशीच अपेक्षा करते की, माझा कूल मुलगा नेहमीच दयाळू आणि जबाबदार व्यक्ती बनून राहो.”
या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केला असून, अनेकांनी युगच्या व्यक्तिमत्त्वाचं कौतुक केलं आहे.
काजोल-अजयची लव्ह स्टोरी
अजय देवगन आणि काजोलची ओळख ‘हलचल’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. तिथूनच त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात झाली. चार वर्षांपर्यंत त्यांनी आपला संबंध गुपित ठेवला आणि अखेर 24 फेब्रुवारी 1999 रोजी मुंबईत खासगी पद्धतीने लग्न केलं. त्यांना 2003 मध्ये मुलगी निसा आणि 2010 मध्ये मुलगा युग झाला. देवगन कुटुंब बॉलिवूडमधील सर्वांत डाउन टू अर्थ आणि सुसंस्कृत कुटुंब म्हणून ओळखलं जातं.
अजय देवगनचा धमाल 4 मध्ये धमाका
सध्या अजय देवगन आपल्या आगामी चित्रपट ‘धमाल 4’ मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन इंद्र कुमार करत असून, हे कॉमेडी फ्रँचायझीतील एक बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट मानलं जातं. या चित्रपटात अजयसोबत रितेश देशमुख, अरशद वारसी, संजय मिश्रा, ईशा गुप्ता, संजीदा शेख, अंजली आनंद, उपेंद्र लिमये, रवि किशन आणि जावेद जाफरी यांसारखे दमदार कलाकारही झळकणार आहेत.
युग देवगन आता किशोरवयात पाऊल टाकत आहे आणि बॉलिवूडच्या झगमगाटातही त्याचं सौम्य वळण लक्षवेधी ठरत आहे. अजय आणि काजोलसारख्या यशस्वी जोडप्याचे मूल असलं तरी, युगचे संस्कार, साधेपणा आणि शांत स्वभाव सोशल मीडियावरूनच स्पष्ट दिसून येतात. देवगन कुटुंबाचा हा खास क्षण अनेकांना कौटुंबिक नात्यांची आठवण करून देणारा ठरतोय.











