बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) त्याच्यातील दिलदारपणा पुन्हा एकदा दाखवला आहे. अक्षय कुमारने पंजाब मधील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पंजाब मधील पूरग्रस्तांना आर्थिक म्हणून अक्षय कुमारने पाच कोटी रुपये दिले आहेत. अक्षय कुमार प्रमाणेच बॉलीवूडच्या इतरही काही कलाकारांनी पंजाब मधील पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत दिली आहे.
काय म्हणाला अक्षय कुमार?? Akshay Kumar
या देणगीबद्दल बोलताना अक्षय म्हणाला, हो, मी पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य खरेदी करण्यासाठी ५ कोटी रुपये देत आहे, पण मी कोण आहे दान करणारा?? जेव्हा मला मदतीचा हात पुढे करण्याची संधी मिळते तेव्हा मी स्वतःला धन्य समजतो. माझ्यासाठी, ही माझी सेवा आहे, माझे छोटेसे योगदान आहे. मी प्रार्थना करतो की पंजाबमधील माझ्या बंधू-भगिनींवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीवर लवकरच मात व्हावी.

संकटात अक्षय नेहमीच मदतीला धावतो –
आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत करण्याची अक्षय कुमारची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीचा इतिहास बघितला तर जेव्हा जेव्हा देशावर संकट आले तेव्हा तेव्हा अक्षय कुमारने आपला मदतीचा हात नेहमीच पुढे केला आहे. यापूर्वी त्याने चेन्नई पूर आणि कोरोना काळातही मोठी आर्थिक मदत केली होती. एवढेच नव्हे तर “भारत के वीर” उपक्रमाद्वारे त्याने सैनिकांच्या कुटुंबांना सुद्धा मदत केली आहे.
अक्षय कुमार व्यतिरिक्त आणखी कोणी मदत केली
अक्षय कुमार व्यतिरिक्त बॉलीवूड मधील दिलजीत दोसांझ, सोनू सूद, रणदीप हुड्डा, गिप्पी ग्रेवाल, हिमांशी खुराणा, जसबीर जस्सी, करण औजला, गुरु रंधावा आणि अॅमी विर्क यासारख्या सेलिब्रिटींनीही पंजाब मधील पूरग्रस्तांसाठी आर्थिक हातभार लावला.
पंजाब मध्ये भीषण महापूर–
दरम्यान यावर्षी कधी नव्हे तो पंजाब मध्ये सर्वात मोठा महापुराला आहे या महापुरात 1655 गावे अडकली आहेत. गुरुदासपूर मधील 324 गावे फिरोजपुर मधील 111 अमृतसर मधील 109, कपूरथळा मधील 123, संगरूर मधील 107, होशियारपूर मधील 121 गावे महापुराच्या विळख्यात आहेत. पंजाब सरकारच्या म्हणण्यानुसार या महापुरात एकूण १,७५,२१६ हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले आहे.











