‘JOLLY LLB 3’ चा आजपासून ओटीटीवर धुमाकूळ सुरू; कुठे अन् कसा पाहता येणार सिनेमा?

'जॉली एलएलबी 3' आजपासूनच ओटीटी वर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. अक्षय कुमार आणि अरशद वारसीचा कोर्टरूम ड्रामा आता तुम्हाला घरबसल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा चित्रपट, ‘जॉली एलएलबी ३’ ओटीटी रिलीजची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. आता हा कोर्टरूम ड्रामा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट १८ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर सात आठवड्यांनी तो ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलं आहे. हा चित्रपट तुम्ही कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ‘जॉली एलएलबी ३’च्या ओटीटी रिलीजसाठी दोन प्लॅटफॉर्मवर बातम्या आल्या होत्या. हा चित्रपट नेटफ्लिक्स आणि जिओहॉटस्टारवर प्रदर्शित होणार याबद्दल सांगण्यात आलं होतं. शेवटी हा चित्रपट १४ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

नेटफ्लिक्सवर पाहा ‘JOLLY LLB 3’

प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षांसह चित्रपटगृहात दाखल झालेला आणि प्रेक्षकांची मनं जिंकणारा अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांचा बहुचर्चित चित्रपट ‘जॉली एलएलबी ३’ आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होण्यासाठी सज्ज आहे. या कॉमेडी-ड्रामा फ्रँचायझीतील मागील चित्रपटांना मिळालेल्या प्रचंड यशामुळे दोन्ही ‘जॉली’ मिळून कोर्टात यावेळी काय हंगामा करतात, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केल्यानंतर आता तो ओटीटीवर देखील लकवरच रिलीज झाला आहे.

जॉली एलएलबी 3 चित्रपट आजपासूनच नेटफ्लिक्सवर उपलब्ध झाला आहे. अक्षय कुमार आणि अरशद वारसी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा कोर्टरूम कॉमेडी ड्रामा 19 सप्टेंबर 2025 रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सौरभ शुक्ला (न्यायाधीश त्रिपाठी), राम कपूर, गजराज राव, सीमा बिस्वास, अमृता राव, हुमा कुरेशी, शिल्पा शुक्ला, बृजेंद्र काला आणि अविजित दत्त यांसारखे अनेक महत्त्वाचे कलाकार आहेत.

नेटफ्लिक्सनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ‘जॉली एलएलबी ३’च्या रिलीजची घोषणा केली. चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, ‘माय लॉर्ड, जॉली बनण्याची परवानगी, कारण तारीख निश्चित झाली आहे! १४ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर ‘जॉली एलएलबी ३’ पाहा.’ नेटफ्लिक्सची पोस्ट पाहून चाहते खूप आनंदी झाले आहेत. आता हा चित्रपट तुम्ही खरी बसून पाहू शकता. दरम्यान या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती. हा चित्रपट अनेकांना खूप आवडला होता.

‘JOLLY LLB 3’ मध्ये काय विशेष?

सुभाष कपूर दिग्दर्शित आणि स्टार स्टुडिओ 18 तसेच कांगरा टॉकीज निर्मित हा चित्रपट सुमारे 120 कोटी रुपयांच्या अंदाजित बजेटमध्ये बनला होता. जॉली एलएलबी 3 ला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि त्याने भारतात 116.75 कोटी तर जगभरात 170.8 कोटी रुपयांची कमाई केली. या कमाईसह हा चित्रपट या फ्रँचायझीमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

चित्रपटाची कथा राजस्थानमधील परसौल या ग्रामीण भागावर आधारित आहे. एका गरीब शेतकऱ्याच्या पत्नीची (जानकी राजाराम सोलंकी) भावनिक कथा यात दाखवली आहे, जानकीच्या पतीने श्रीमंत उद्योगपतीने जमीन हडपल्यामुळे आत्महत्या केली होती. या हृदयद्रावक घटनेमुळे न्यायालयात दोन योगायोगाने जॉली नावाच्या वकिलांमध्ये संघर्ष पेटतो. 2 तास 37 मिनिटांच्या या चित्रपटात ड्रामा, सामाजिक भाष्य आणि मनोरंजन यांचा प्रभावी समतोल साधण्यात आला आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News