बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या संघर्षांविषयी भावनिक किस्सा सांगितला आहे. सुमारे चार दशकांहून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या खेर यांनी सांगितले की, “मुंबईत लाखो लोक स्वप्न घेऊन येतात, पण यश फार थोड्यांना मिळतं. हार मानता कामा नये.”
‘सारांश’साठी मिळालेलं पहिलं मोठं काम अचानक गेलं! Anupam Kher
अनुपम खेर यांनी सांगितले की, १९८४ मध्ये ‘सारांश’ या चित्रपटात त्यांना मुख्य भूमिका मिळाली होती. मात्र नंतर ती भूमिका अनुभवी अभिनेते संजीव कुमार यांना देण्यात आली. हा प्रसंग त्यांच्या आयुष्यातील एक मोठा धक्का होता. “मी तेव्हा गप्प बसलो असतो, स्वतःसाठी उभा राहिलो नसतो, तर आज या स्थानावर असलोच नसतो,” असे खेर भावूक होत म्हणाले.

महेश भट्ट यांच्याशी सातत्याने संपर्क
मी तेव्हा हार मानली नाही. सतत महेश भट्ट यांना भेटत राहिलो, माझ्या भूमिकेसाठी लढत राहिलो आणि शेवटी मला संधी मिळाली. तीच संधी माझं करिअर बदलणारी ठरली,” असे ते म्हणाले. अनुपम खेर यांनी सांगितले की, फक्त ‘सारांश’ नाही, तर ‘लम्हे’ (यश चोप्रा यांच्या चित्रपटात) काम करतानाही त्यांनी अशाच संकटांचा सामना केला होता.”माझ्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत प्रत्येक यशामागे एक संघर्ष आहे,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
‘तन्वी द ग्रेट’ पुन्हा थिएटरमध्ये
अनुपम खेर लवकरच त्यांची ‘तन्वी द ग्रेट’ ही चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित करत आहेत. त्यांनी सांगितले की, “मला दुसऱ्या संधींवर विश्वास आहे. जसं UPSC मध्ये दुसरी परीक्षा देता येते, तसंच चित्रपटांनाही दुसरी संधी मिळाली पाहिजे. हा चित्रपट २६ सप्टेंबर रोजी केवळ २० शहरांमध्ये मर्यादित स्वरूपात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तो प्रदर्शित केला जाणार आहे.
चित्रपटांच्या गाण्यांचा प्रभाव
“प्रेक्षकांना आजही एक छान प्रेमकथा आवडते. मोहित सूरीसारखे दिग्दर्शक ‘आशिकी’सारख्या सिनेमांमधून जुनं जादू परत आणतात. पण थेटर मालक आणि डिस्ट्रीब्युटर फक्त बॉक्स ऑफिसवर हिट होणाऱ्या चित्रपटांकडेच लक्ष देतात,” अशी खंतही अनुपम खेर यांनी व्यक्त केली.