पँडोराचा अग्निप्रवेश: ‘Avatar : Fire and Ash’ चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Asavari Khedekar Burumbadkar

Avatar : Fire and Ash  या चित्रपटाचा नवीन ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित आणि जागतिक स्तरावर लोकप्रिय ठरलेल्या अवतार मालिकेतील हा तिसरा भाग आहे. हा चित्रपट १९ डिसेंबर २०२५ रोजी जगभरात प्रदर्शित होणार असून, त्याच्यापूर्वीच ट्रेलरने चित्रपटाबद्दल अनेक प्रश्न आणि चर्चा निर्माण केल्या आहेत.

या नव्या ट्रेलरमध्ये पँडोराच्या भव्य आणि नेत्रदीपक दृश्यांसोबतच एक नवीन जमात Ash Clan ची ओळख करून दिली आहे. ही जमात आगीशी संबंधित असून तिचे स्वरूप अधिक उग्र आणि धोकादायक दाखवले गेले आहे. या जमातीचा संबंध पँडोराच्या एका वेगळ्या आणि आतापर्यंत न पाहिलेल्या प्रदेशाशी आहे. जिथे ज्वालामुखी, राख आणि उष्णतेचा प्रभाव जाणवतो. त्यामुळे या चित्रपटात नैसर्गिक वातावरणाबरोबरच सांस्कृतिक संघर्ष आणि राजकीय उलथापालथ दिसून येण्याची शक्यता आहे.

काय आहे ट्रेलर मध्ये – Avatar : Fire and Ash

ट्रेलरमध्ये Jake Sully आणि Neytiri या मुख्य पात्रांची मानसिक आणि भावनिक लढाईदेखील अधोरेखित करण्यात आली आहे. या दोघांना केवळ त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करायचे नसून, नव्या जमातींच्या संघर्षातही आपली भूमिका ठरवावी लागते. विशेषतः Ash Clan चे नेतृत्व करणारी Varang (Oona Chaplin) ही एक प्रभावशाली आणि उग्र नेता असून ती मुख्य विरोधक म्हणून सादर केली गेली आहे. तिचा संबंध या जगातील जुन्या जखमा आणि सूडाच्या भावनांशी जोडलेला असल्याचे ट्रेलरमध्ये सूचित केले आहे.

प्रेक्षकांना मोठी मेजवानी

जगभरातील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट IMAX 3D, Dolby Cinema, RealD 3D, 4DX आणि ScreenX अशा उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानासह प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना केवळ कथा नाही तर दृश्यांचाही भव्य अनुभव मिळणार आहे. त्याचबरोबर, Avatar: The Way of Water हा दुसरा भाग लवकरच पुन्हा एकदा ३डी फॉरमॅटमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. या री-रिलीजमध्ये Fire and Ashमधील काही खास दृश्यांची झलकही दाखवली जाणार आहे.

एकूणच, Avatar : Fire and Ash हा चित्रपट केवळ दृश्यांची पर्वणी ठरणार नाही तर भावनिक, राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अधिक गहन असेल, असे या ट्रेलरवरून स्पष्ट होते. जेम्स कॅमेरॉनच्या दिग्दर्शनाखाली पँडोराच्या या नवीन प्रवासाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहत आहेत.

ताज्या बातम्या