बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ च्या बागी ४’ (Baaghi 4) या चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. उद्या म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. टायगर श्रॉफ आणि संजय दत्त यांचा ‘बागी ४’ हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. परंतु त्याच्या प्रदर्शनापूर्वीच सेन्सॉर बोर्डाने अनेक सीन कट केले आहेत.
तब्बल २३ कट मारण्यात आले- Baaghi 4
बॉलीवूड हंगामातील एका वृत्तानुसार, साजिद नाडियाडवाला यांच्या बॅनरखाली बनवलेल्या या चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र मिळाले आहे, परंतु हिंसाचाराशी संबंधित अनेक दृश्ये बोर्डाच्या नजरेतून सुटली नाहीत. परिणामी चित्रपटात २३ कट करण्यात आले. यामध्ये धार्मिक भावना दुखावणारे दृश्ये, आक्षेपार्ह संवाद आणि रक्तपाताशी संबंधित अनेक दृश्ये समाविष्ट आहेत

कोणकोणते सीन हटवले ??
१) चित्रपटात एक दृश्य होते ज्यामध्ये नायक एका शवपेटीवर उभा आहे. हे दृश्य पूर्णपणे हटवण्यात आले होते.
२) एक पात्र ‘निरंजन दिया’ म्हणजेच मंदिरातील दिव्यामधून सिगारेट पेटवतो. हा दृश्य फक्त १ सेकंदाचा होता परंतु या सीन ला सुद्धा काढून टाकण्यात आले.
३) एका सीन मध्ये तर, एक पात्र एका मुलीच्या कंबरेला स्पर्श करते. हे दृश्य बदलण्यात आले आहे.
४) चित्रपटात एक सीन न्यूड सीन आहे …. जो सेन्सॉर बोर्डाने हाईड केला होता.
५) संजय दत्तने कापलेल्या हाताने सिगारेट पेटवतानाचा दृश्य काढून टाकण्यात आला होता. हा सीन १३ सेकंदाचा होता जो पूर्णपणे काढून टाकण्यात आला.
६) येशू ख्रिस्ताच्या पुतळ्यावर चाकू फेकण्याचे दृश्य काढून टाकण्यात आले.
७) येशूच्या पुतळ्याला मुक्का मारण्याचा आणि त्याला नमन करण्याचा सीन काढून टाकण्यात आला होता.
८) तीन ठिकाणी गळा चिरण्याचे दृश्य काढून टाकण्यात आले
९) हात कापण्याचे दृश्य काढून टाकण्यात आले.
१०) गुंडांना तलवारीने कापण्याचे दोन सीन काढून टाकण्यात आले.
११) ११ सेकंदांपेक्षा जास्त काळ लढाईचा एक सीन डिलिट करण्यात आला.
१२) एखाद्याच्या डोक्यात तलवार घुसवण्याचा सीन काढून टाकण्यात आला.











