Bollywood Box Office Collection : मस्ती 4 की 120 बहादुर?? बॉक्स ऑफिसवर कोणाची चलती??

पहिल्या तीन दिवसांच्या आकड्यांवरून स्पष्ट होते की प्रेक्षकांनी देशभक्तीप्रधान ‘120 बहादुर’ला जास्त पसंती दिली आहे. ‘मस्ती 4’ ने ठीक-ठाक कामगिरी केली असली तरी ‘120 बहादुर’ने कमाईत त्याला मागे टाकत आपली पकड मजबूत केली आहे

Bollywood Box Office Collection : बॉलिवूडमध्ये या आठवड्यात दोन मोठ्या चित्रपटांमध्ये खणखणीत टक्कर पाहायला मिळाली. एका बाजूला कॉमेडी आणि एंटरटेन्मेंटने भरलेला ‘मस्ती 4’, तर दुसऱ्या बाजूला देशभक्तीची भावना चेतवणारा ‘120 बहादुर’ एकाच दिवशी प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती, पण तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस आकडे स्पष्ट करतात की कोणत्या चित्रपटाने जोरदार कामगिरी केली आणि कोण गडबडला.

मस्ती 4’ ने रंगवला मनोरंजनाचा फुल्ल डोस

विवेक ओबेरॉय, आफताब शिवदासानी आणि रितेश देशमुख यांच्या तिकडीने पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मस्ती’ फ्रँचायझीला प्रेक्षकांकडून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने चौथ्या भागाबद्दलही उत्साह होता. 21 नोव्हेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 1.86 कोटींची कमाई केली. त्यामुळे तीन दिवसांची एकूण कमाई 7.36 कोटींवर पोहोचली आहे. Bollywood Box Office Collection

‘120 बहादुर’ला देशभक्तीचा मजबूत आधार (Bollywood Box Office Collection)

फरहान अख्तर प्रस्तुत आणि रजनीश राजी दिग्दर्शित ‘120 बहादुर’ने बॉक्स ऑफिसवर अधिक स्थिरता दाखवली आहे. देशसेवेची कहाणी सांगणाऱ्या या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तब्बल 2.6 कोटींची कमाई करत एकूण कलेक्शन 8.7 कोटींवर नेले आहे.

पहिल्या तीन दिवसांच्या आकड्यांवरून स्पष्ट होते की प्रेक्षकांनी देशभक्तीप्रधान ‘120 बहादुर’ला जास्त पसंती दिली आहे. ‘मस्ती 4’ ने ठीक-ठाक कामगिरी केली असली तरी ‘120 बहादुर’ने कमाईत त्याला मागे टाकत आपली पकड मजबूत केली आहे. जरी हे आकडे प्राथमिक असले आणि रात्रीच्या शोमधून कमाई आणखी वाढू शकते, तरी सध्याच्या घडीला बॉक्स ऑफिसवर ‘120 बहादुर’चे वर्चस्व दिसून येत आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News