Bollywood News: शाहरुख- दीपिकाला मोठा दिलासा!! राजस्थान हायकोर्टने FIR वर घातली स्थगिती

भरतपूरमध्ये दाखल करण्यात आलेल्या FIR वर हायकोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. ही केस खराब कारशी संबंधित असून, एका स्थानिक नागरिकाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली होती.

बॉलिवूड सुपरस्टार (Bollywood News) शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांना राजस्थान हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. भरतपूरमध्ये दाखल करण्यात आलेल्या FIR वर हायकोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. ही केस खराब कारशी संबंधित असून, एका स्थानिक नागरिकाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली होती.

काय आहे प्रकरण?? Bollywood News 

भरतपूर येथील रहिवासी कीर्ती सिंह यांनी हुंडई अल्काझार (2022 मॉडेल) ही कार सुमारे ₹23.97 लाखांमध्ये सोनीपत (हरयाणा) येथील डीलरकडून खरेदी केली होती. गाडीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग दोष असल्याचा आरोप त्यांनी केला असून, यासंदर्भात त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ही तक्रार केवळ कार कंपनीच्या अधिकाऱ्यांवरच नाही, तर ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेल्या शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्यावरही करण्यात आली होती. त्यामुळे दोघांचीही नावं FIR मध्ये समाविष्ट करण्यात आली होती.

शाहरुखचे वकील काय म्हणाले?

शाहरुख खान यांच्यातर्फे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात युक्तिवाद करताना सांगितले की, अभिनेता केवळ ब्रँड प्रमोशन करतो, उत्पादनातील दोष किंवा मॅन्युफॅक्चरिंग स्टँडर्डससाठी तो जबाबदार नाही. दीपिका पदुकोण यांच्यातर्फे वकील माधव मित्रा यांनीही असेच प्रतिपादन केले की, अभिनेत्रीचा कारच्या निर्मिती प्रक्रियेशी किंवा गुणवत्ता नियंत्रणाशी काहीही संबंध नाही.

या युक्तिवादानंतर, राजस्थान हायकोर्टाच्या एकलपीठाने भरतपूर पोलिसांनी दाखल केलेल्या FIR वर स्थगितीचा आदेश दिला आहे. त्यामुळे शाहरुख आणि दीपिकाविरुद्ध कोणतीही पुढील कायदेशीर कारवाई सध्या होणार नाही. या प्रकरणी पुढील सुनावणीची तारीख लवकरच निश्चित केली जाणार आहे. दरम्यान, ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेल्या व्यक्तींना उत्पादन दोषांसाठी थेट जबाबदार धरता येईल का, यावर यामुळे महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा उभा राहिला आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News