आजचा दिवस बॉलीवूडसाठी ( Bollywood News) विशेष ठरला आहे. एकीकडे सुपरस्टार सलमान खानच्या आगामी देशभक्तीपूर्ण सिनेमाचा ‘बॅटल ऑफ गलवान’ फर्स्ट लुक समोर आला आहे, तर दुसरीकडे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनी एआय (AI) तंत्रज्ञानाने तयार झालेल्या त्यांच्या बनावट छायाचित्रांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
सलमान खानचा ‘बॅटल ऑफ गलवान’ फर्स्ट लुक –
सलमान खानने आपल्या सोशल मिडिया हँडलवरून ‘बॅटल ऑफ गलवान’ या आगामी चित्रपटाचा पहिला लुक शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमान आर्मी ड्रेसमध्ये, कडेकोट थंडी आणि बर्फाच्छादित परिसरात दिसत आहे. त्याच्या मागे भारतीय झेंडा फडकताना दिसत असून चित्रपटाची पार्श्वभूमी २०२० मधील गलवान खोऱ्यातील संघर्षावर आधारित असल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांनुसार, हा चित्रपट वास्तविक घटनांवर आधारित असून भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथेचे चित्रण करणार आहे. सलमान खान या चित्रपटात भारतीय लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून चित्रपटाचे शूटिंग लडाख आणि मनाली येथे सुरु आहे.
एश्वर्या राय बच्चन दिल्ली उच्च न्यायालयात – Bollywood News
दरम्यान, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने बनावट AI तंत्रज्ञानाच्या आधारे तयार झालेल्या त्यांच्या अश्लील किंवा अवास्तविक छायाचित्रांचा निषेध करत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिच्या परवानगीशिवाय ही चित्रे कॉफी मग, कपडे, पोस्टर्स अशा व्यावसायिक वस्तूंवर छापून विक्रीसाठी वापरली जात आहेत. हे तिच्या वैयक्तिक आणि प्रतिमाधिकारांचे उल्लंघन असल्याचे ऐश्वर्याचे म्हणणे आहे.
तिने आपल्या याचिकेत स्पष्ट केलं की “या छायाचित्रांचा माझ्याशी काहीही संबंध नाही. त्या सर्व प्रतिमा AI द्वारे तयार करण्यात आल्या असून त्यात माझ्या प्रतिमेचा गैरवापर करण्यात आला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने प्राथमिक सुनावणीत संबंधित वेबसाईट्स आणि प्लॅटफॉर्म्सना नोटीस बजावली असून लवकरच पुढील सुनावणी अपेक्षित आहे.











