Border 2 Varun Dhawan Look : वरुण धवनचा ‘बॉर्डर 2 ’ मधील जबरदस्त लूक; या दिवशी चित्रपट प्रदर्शित होणार

बॉर्डर २’ मध्ये वरुण धवनसोबत सनी देओल, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वी सनी देओलचा पहिला लुक समोर आला होता, ज्याला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता वरुणचा लुक प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ यांच्या लुकची उत्सुकता लागली आहे.

प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘बॉर्डर २’ चित्रपटातून अखेर अभिनेता वरुण धवनचा पहिला लुक (Border 2 Varun Dhawan Look)समोर आला आहे. सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमध्ये वरुण हातात बंदूक घेऊन रणांगणावर शत्रूंशी लढताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग आणि देशभक्तीची भावना चाहत्यांच्या मनाला भिडत आहे. हा चित्रपट कधी रिलीज होणार हे सुद्धा वरून धवनने जाहीर केलं आहे.

कधी होणार प्रदर्शित –

वरुण धवनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा पोस्टर शेअर (Border 2 Varun Dhawan Look) करताना आपल्या भूमिकेचे नावही उघड केले आहे. त्यांनी लिहिले आहे की,“देश का सिपाही PVC होशियार सिंह दहिया”. याचसोबत त्यांनी सांगितले की ‘बॉर्डर २’ हा चित्रपट आगामी २३ जानेवारीला, म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या पोस्टरनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही चाहत्यांनी “अब आएगा मजा” असे लिहिले, तर काहींनी वरुणला “ऑल द बेस्ट वीडी” अशी शुभेच्छा दिल्या. दिग्दर्शक करण जोहर यांनीही फायर इमोजी पोस्ट करून वरुणच्या नव्या लूकचे कौतुक केले. पोस्टर शेअर झाल्यानंतर काही मिनिटांतच हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.

वरूण सोबत कोणकोण कलाकार –

‘बॉर्डर २’ मध्ये वरुण धवनसोबत सनी देओल, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वी सनी देओलचा पहिला लुक समोर आला होता, ज्याला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता वरुणचा लुक प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ यांच्या लुकची उत्सुकता लागली आहे. हा चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल आहे. या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग करत आहेत. देशभक्ती, शौर्य आणि सैनिकांच्या बलिदानाची कहाणी सांगणारा ‘बॉर्डर २’ हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या आसपास प्रेक्षकांसाठी एक देशभक्तीपूर्ण भेट ठरणार आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News