Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर सध्या दोन मोठे चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. रणवीर सिंहचा अॅक्शन आणि ड्रामाने परिपूर्ण ‘धुरंधर’ आणि धनुष व कृति सेनन यांच्या अभिनयाने सजलेला ‘तेरे इश्क में’. दोन्ही चित्रपटांचे विषय, शैली आणि प्रस्तुतीकरण वेगवेगळे असले तरी प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे दोन्हींच्या कलेक्शनकडे संपूर्ण इंडस्ट्रीचे लक्ष लागले आहे. वीकेंडनंतर सोमवार हा कोणत्याही चित्रपटासाठी परफॉर्मन्स दर्शवणारा दिवस असतो. या दिवशी प्रेक्षकांची संख्या काहीशी घटते, मात्र या दोन्ही चित्रपटांनी सोमवारीही चांगली कमाई करत आपली ताकद सिद्ध केली आहे.
धुरंदर तुफान फॉर्मात (Box Office Collection)
‘धुरंधर’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज ओपनिंग घेतली. रणवीर सिंहचा दमदार लूक, त्याची एनर्जी आणि अॅक्शन सिक्वेन्स यामुळे प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली होती. या उत्सुकतेचे रूपांतर पहिल्या दिवशी मिळालेल्या 28 कोटींच्या कमाईत दिसून आले. दुसऱ्या दिवशी ही आकडेवारी 32 कोटींपर्यंत पोहोचली आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी तर चित्रपटाने 43 कोटींचा मोठा टप्पा पार केला. वीकेंडच्या तिन्ही दिवसांत मिळालेल्या विक्रमी कमाईनंतर सोमवारी किंचित घट झाली असली तरी ‘धुरंधर’ने 23 कोटींची मजबूत कमाई केली आणि चार दिवसांतील एकूण कलेक्शन थेट 126.24 कोटींवर पोहोचले. एका आठवड्याच्या सुरुवातीला इतका दमदार आकडा गाठणे हे रणवीरच्या स्टारडमचे तसेच चित्रपटाच्या कंटेंटचे मोठे यश मानले जात आहे.

दुसरीकडे, ‘तेरे इश्क में’नेही आपले अस्तित्व ठामपणे कायम ठेवले आहे. ‘धुरंधर’सारख्या बिग-बजेट आणि चर्चेतील चित्रपटाशी सामना असूनही या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स दिला. धनुष आणि कृति सेनन यांच्या सळसळत्या केमिस्ट्रीमुळे तसेच भावुक प्रेमकथेच्या मांडणीमुळे चित्रपटाला तरुण प्रेक्षकांचे विशेष आकर्षण मिळाले. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची कमाई स्थिरच राहिली आणि शनिवार–रविवारी पुन्हा एकदा थिएटर्समध्ये गर्दी वाढू लागली. यामुळे कलेक्शनमध्ये देखील वाढ झाली आणि सोमवारीही चित्रपटाने 2.5 कोटींची भर घालत आपली एकूण कमाई 102.54 कोटी रुपयांवर नेली. ‘तेरे इश्क में’चा स्थिर ग्राफ त्याच्या तोंडभरून मिळणाऱ्या कौतुकाचे आणि उत्तम वर्ड ऑफ माऊथचे द्योतक आहे. Box Office Collection
तेरे इश्क वर धुरंदर भारी
सोमवारीच्या दोन्ही चित्रपटांच्या कलेक्शनची तुलना केली तर ‘धुरंधर’ स्पष्टपणे वरचढ ठरला आहे. पण ‘तेरे इश्क में’ने अत्यंत मर्यादित स्पर्धा आणि मोठ्या चित्रपटाच्या दडपणातही शंभर कोटींचा टप्पा सहज ओलांडला आहे, हेही कमालीचे आहे. दोन्ही चित्रपटांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले असून एकीकडे ‘धुरंधर’ त्याच्या अॅक्शन आणि भव्यतेमुळे तर ‘तेरे इश्क में’ भावनिक कथा आणि सुंदर सादरीकरणामुळे प्रेक्षकांना बांधून ठेवत आहेत. पुढील काही दिवसांत या दोन्ही चित्रपटांची कमाई कोणत्या दिशेने जाते, हे पाहणे नक्कीच रोचक ठरणार आहे.











