2025 हे वर्ष बॉक्स ऑफिससाठी (Dashavatar Box Office Collection) एक मोठा धक्का देणारं ठरतंय. मोठ्या स्टारकास्ट आणि कोट्यवधींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमांनी अपेक्षा अपूर्ण ठेवल्या असताना, एका सोज्वळ आणि आशयघन मराठी चित्रपटाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तो चित्रपट म्हणजे ‘दशावतार’ आणि या चित्रपटाच्या यशामागे उभे आहेत वयोवृद्ध पण तितकेच ताकदीचे अभिनेते दिलीप प्रभावळकर….
प्रेक्षकांचा खरा राजा कोण?
एका बाजूला अक्षय कुमार आणि अर्शद वारसीसारख्या मोठ्या कलाकारांचा ‘एलएलबी 2’ अपेक्षा पूर्ण करू शकलेला नाही, तर दुसरीकडे 81 वर्षीय दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाने सजलेला ‘दशावतार’ प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसला आहे. वयाच्या ८ दशकांनंतरही दिलीपजींनी साकारलेली भूमिका इतकी प्रभावी ठरली आहे की, सिनेमाच्या कथेइतकीच त्यांची उपस्थिती चर्चेत आहे.

फक्त 5 कोटींचं बजेट, कमाई 17.50 कोटींच्या घरात! Dashavatar Box Office Collection
सिनेमाने केवळ 12 दिवसांत 17.50 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. सुरुवातीला 6 लाखांच्या व्यवसायाने झेप घेतलेल्या या चित्रपटाने एका आठवड्यातच 9.2 कोटींचा टप्पा पार केला होता. विशेष म्हणजे, फक्त 5 कोटींमध्ये बनलेल्या या सिनेमाने आपल्या बजेटच्या तिप्पटहून अधिक कमाई केली आहे .Dashavatar Box Office Collection
‘जारण’लाही मागे टाकलं, आता टार्गेट 20 कोटींचा!
‘दशावतार’ने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर इतर यशस्वी चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. ‘जारण’सारख्या लोकप्रिय सिनेमालाही ‘दशावतार’ने टक्कर देत दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी 85 लाखांची कमाई केली. अशीच गती राहिली, तर लवकरच हा सिनेमा 20 कोटींचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर असेल.
दिलीप प्रभावळकर – नावातच आहे ‘प्रभाव’
दिलीप प्रभावळकर हे मराठी सिनेसृष्टीतील एक बहुमुखी व्यक्तिमत्त्व आहे. लेखक, दिग्दर्शक, नट प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपला ठसा उमठवला आहे. ‘लगे रहो मुन्नाभाई’मध्ये महात्मा गांधींची भूमिका साकारून त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. आज, ‘दशावतार’मधील त्यांच्या सशक्त अभिनयामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. मोठ्या नावांपेक्षा मजबूत आशय आणि प्रभावी अभिनय प्रेक्षकांना जास्त भावतो, हे ‘दशावतार’ने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. वयाच्या 81व्या वर्षी दिलीप प्रभावळकर यांचं हे यश नव्या पिढीच्या कलाकारांसाठीही एक प्रेरणा आहे!











