Deepika – Ranveer Baby Birthday : दीपिका-रणवीरची मुलगी ‘दुआ’ झाली वर्षाची; लेकीसाठी बनवला खास केक, पहा पोस्ट

दीपिकाने स्वतः आपल्या मुलीसाठी एक स्पेशल चॉकलेट केक बनवला आणि तोच केक वाढदिवसानिमित्त कापण्यात आला.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांची कन्या दुआ नुकतीच एक वर्षांची झाली (Deepika – Ranveer Baby Birthday) आहे. ८ सप्टेंबर २०२४ रोजी जन्मलेली दुआ आता एका वर्षाची झाली असून, तिच्या वाढदिवसाचा खास सेलिब्रेशन आई-वडिलांनी अतिशय खास आणि घरगुती पद्धतीने साजरा केला. दीपिकाने स्वतः आपल्या मुलीसाठी एक स्पेशल चॉकलेट केक बनवला आणि तोच केक वाढदिवसानिमित्त कापण्यात आला. हा खास क्षण दीपिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. फोटोमध्ये दीपिका आणि रणवीरने केक कटिंगचा आनंद घेतलेला दिसत आहे.

काय आहे दीपिकाची पोस्ट – Deepika – Ranveer Baby Birthday

फोटोच्या कॅप्शनमध्ये दीपिका लिहिते “माझ्या प्रेमाची अनोखी भाषा… माझ्या लेकीच्या वाढदिवसासाठी स्वतःच्या हातांनी केक बनवणं.” ह्या ओळीतून तिच्या भावना स्पष्ट दिसतात. सोशल मीडियावर दीपिकाच्या या केकबाबत कौतुकाचा वर्षाव होत असून, चाहते दुआला भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. बऱ्याच जणांनी दीपिकाच्या कुकिंग स्किल्स चंही भरभरून कौतुक केलं आहे. Deepika – Ranveer Baby Birthday

दीपिकाचा पुढचा सिनेमा काय?

‘सिंघम अगेन’ नंतर दीपिका पदुकोण अभिनयातून थोडा ब्रेक घेत आहे. ह्याच दरम्यान तिने आपल्या कन्येला जन्म दिला. आता तिचा आगामी सिनेमा AA22xA6 असून त्यात ती साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक एटली सोबत झळकणार आहे. या चित्रपटात दीपिकाचा दमदार अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचं लग्न १४ आणि १५ नोव्हेंबर २०१८ रोजी इटलीमधील लेक कोमो येथे पारंपरिक पद्धतीने पार पडलं. त्यांनी दोन्ही कुटुंबांच्या परंपरांचा आदर राखत पारंपरिक पद्धतीने विवाह केला. या लग्नाचा खास भाग म्हणजे त्याची अत्यंत गोपनीयता फार थोड्या पाहुण्यांना बोलावलं गेलं होतं आणि कोणत्याही प्रसारमाध्यमांना प्रवेश नव्हता. पाच वर्षांनंतर, २०२३ मध्ये त्यांनी त्यांच्या लग्नाचे अधिकृत व्हिडिओ पहिल्यांदा ‘Koffee With Karan’ शोवर शेअर केले, जेव्हा चाहत्यांना त्यांच्या लग्नाच्या खास क्षणांची झलक मिळाली.

सध्या दीपिका पादुकोण तिच्या करिअरमध्ये अत्यंत सक्रिय आहे. तिचे अनेक मोठे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. ‘King’ हा एक भव्य प्रोजेक्ट आहे, ज्यात ती शाहरुख खानसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. त्याचप्रमाणे, दीपिका ‘AA22xA6’ या साय-फाय थ्रिलरमध्ये अल्लू अर्जुनसोबत काम करणार आहे, ज्याचं दिग्दर्शन अतली करणार आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

काही महिन्यांपूर्वी ‘Kalki 2898 AD’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या सिक्वेलमधून दीपिकाने बाहेर पडल्याचं समजलं, कारण तिने शूटिंगच्या वेळापत्रकात बदलाची मागणी केली होती. तसेच, ‘Spirit’ या आणखी एका प्रोजेक्टमधूनही ती बाहेर पडल्याचं रिपोर्ट्समध्ये म्हटलं जातं. याशिवाय ती ‘Brahmastra Part 2: Dev’ मध्ये रणबीर कपूरच्या आई ‘अमृता’ या भूमिकेत पुन्हा झळकणार आहे. या चित्रपटाचा भाग डिसेंबर २०२६ मध्ये रिलीज होण्याची अपेक्षा आहे.

दीपिका आणि रणवीर यांचं वैयक्तिक आयुष्य जितकं खास आहे, तितकंच व्यावसायिक आयुष्यातही दोघं अत्यंत यशस्वी आहेत. दीपिका सध्या मातृत्वाच्या टप्प्यावर आहे आणि तरीही आपल्या कामात सुसंगतपणे पुढे जात आहे. तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे तिचे चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News