‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा 6 वर्षांनी बॉलिवूडमध्ये करणार कमबॅक; संजय लिला भन्साळींच्या चित्रपटात झळकण्याची शक्यता!

प्रियांका चोप्रा 6 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. अभिनेत्री पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात आपल्या अभिनयाचं जादू दाखवणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.

देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा 6 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. अभिनेत्री पुन्हा एकदा संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात आपल्या अभिनयाचं जादू दाखवणार आहे. प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये जाण्यापूर्वी  बॉलिवूड चित्रपट ‘द स्काय इज पिंक’ मध्ये दिसली होती.  संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अ‍ॅन्ड वॉर’ या चित्रपटात झळकू शकते, अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

‘लव्ह अॅन्ड वॉर’मधून प्रियांकाचा कमबॅक

या चित्रपटात तिचा एक डान्स नंबर असणार आहे. मात्र याबाबत अद्याप प्रियंका किंवा मेकर्सकडून कोणतंही अधिकृत स्टेटमेंट आलेलं नाही. संजय लीला भन्साळींचा हा चित्रपट रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विक्की कौशल यांसारख्या मोठ्या कलाकारांसह बनणार असून, चाहत्यांना या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रियांकाने भन्साळींच्या ‘राम-लीला’ या चित्रपटात ‘राम चाहे लीला’ या गाण्यावर आपल्या जबरदस्त स्टेप्सने प्रेक्षकांना घायाळ केलं होतं. हे गाणं खूप मोठं हिट ठरलं होतं आणि आजही प्रेक्षक ते गाणं आवडीने ऐकतात. अशात जर ती पुन्हा भन्साळींच्या चित्रपटात डान्स करताना दिसली, तर ते प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरेल. मात्र या बातमीत किती तथ्य आहे, हे मेकर्सच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल.

प्रियांका चोप्राची बॉलिवूडवर वेगळीच छाप

प्रियांका चोप्राने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयात आत्मविश्वास, विविधतेची जाण आणि ग्लॅमर यांचा सुरेख समावेश दिसतो. ‘फॅशन’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘बर्फी’ यांसारख्या चित्रपटांतून तिने आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवली आहे. केवळ सौंदर्य नव्हे, तर अभिनयातील परिपक्वतेमुळे ती प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे.तिने आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश मिळवत भारताचं नाव उज्वल केलं. आता तिचा बॉलिवूडमध्ये पुनरागमन होत असल्याची चर्चा आहे आणि ती संजय लीला भन्साळीसोबत काम करणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तिचं पुनरागमन निश्चितच एक भव्य आणि लक्षवेधी प्रोजेक्ट ठरेल. त्यामुळे प्रियांका चोप्राच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.


About Author

Rohit Shinde

Other Latest News