Dhurandhar Trailer : रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित; तुम्ही पहिला का?

संपूर्ण कथा एका सत्य घटनेवर आधारित असल्याचे ट्रेलरमध्ये सूचित केले आहे. यानंतर रणवीर सिंहची पाकिस्तानमध्ये एंट्री

Dhurandhar Trailer : रणवीर सिंहच्या बहुप्रतीक्षित ‘धुरंधर’ या चित्रपटाचा ट्रेलर आज (18 नोव्हेंबर) प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की डिसेंबरमध्ये प्रेक्षकांना आणखी एक मोठी हिट पाहायला मिळू शकते. या ट्रेलरमध्ये रणवीर सिंहचा नवीन लुक लांब केस, दाट दाढी आणि प्रभावी अभिव्यक्ती चाहत्यांना विशेष भावत आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्स ट्रेलरवर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

चित्रपटात रणवीरसोबत संजय दत्तही दमदार भूमिकेत दिसत आहेत. आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्ना यांच्याही धोकादायक शैलीतल्या भूमिका चर्चेत आहेत. या अॅक्शनने भरलेल्या चित्रपटाचा दुसरा भाग पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याची माहितीही मिळत आहे. पण त्याआधी, हा ट्रेलरच प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे.

ट्रेलरमध्ये काय खास? Dhurandhar Trailer

4 मिनिटे 7 सेकंदांचा ‘धुरंधर’चा ट्रेलर अपेक्षेपेक्षा अधिक प्रभावी ठरला आहे. त्यात अनावश्यक अॅक्शन किंवा हिंसा नसून सर्व काही अगदी संतुलितपणे सादर करण्यात आले आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या शैलीची झलक ट्रेलरमध्ये दिसून येते. संजय दत्त यांचे संवाद तर लक्ष वेधून घेतातच, परंतु रणवीर सिंहच्या एंट्रीवर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अधिक उसळल्या आहेत. ट्रेलरची सुरुवात अर्जुन रामपालच्या संवादाने होते. ते म्हणतात, “1971 च्या युद्धानंतर पाकिस्तानात खूप दुःखी वातावरण होतं. मी सहा वर्षांचा होतो आणि रेडिओ ऐकत होतो. त्या वेळी झिया-उल-हक यांनी एक वाक्य म्हटलं होतं. ‘भारताला हजार जखमांनी लहूलुहान करा. Dhurandhar Trailer

सत्य घटनेवर आधारित कथा

रामपाल या चित्रपटात ISI अधिकारी मेजर इक़बाल यांच्या भूमिकेत दिसतात, ज्यांच्या अनुमतीशिवाय पाकिस्तानच्या राजकारणात काहीही हलू शकत नाही. संपूर्ण कथा एका सत्य घटनेवर आधारित असल्याचे ट्रेलरमध्ये सूचित केले आहे. यानंतर रणवीर सिंहची पाकिस्तानमध्ये एंट्री दाखवली जाते, जिथून प्रतिशोधाच्या लढाईची सुरुवात होते. आर. माधवन भारतीय गुप्तचर विभागात काम करणाऱ्या अजय सान्याल यांच्या भूमिकेत दिसतात. त्यांचा संवाद “कुणाचं तोंड फोडायचं असेल, तर मुठ घट्ट करावी लागते” चाहत्यांच्या खास पसंतीस उतरला आहे.

अक्षय खन्ना रहमान डकैतच्या भूमिकेत आहेत, जो एक निर्दयी कसाई असून पाकिस्तानातील एका राजकीय पक्षाच्या माध्यमातून आपली काळी कृत्ये चालवतो. संजय दत्त एसपी चौधरी असलम या भयंकर व्यक्तिमत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ट्रेलरमध्ये सर्व प्रमुख पात्रांची ओळख करून देत असतानाच, पूर्ण कथा उघड होत नाही. निर्मात्यांनी ही गोष्ट अगदी कौशल्याने दडवून ठेवली आहे. एकूण काय ‘धुरंधर’चा ट्रेलर दमदार, रोमांचक आणि प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घालणारा आहे. रणवीर सिंहची आक्रमक एंट्री, प्रभावी संवाद आणि दमदार स्टारकास्टमुळे चित्रपटाबाबतच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News